News Flash

कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

अनधिकृतपणे मजले उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी भागात दहशतवादविरोधी पथकाने २० बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याच्या पाश्र्वभूमीवर तेथील जुन्या इमारतींवर अनधिकृतपणे मजले उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवल्याप्रमाणे गोंधळ घालून प्रश्नोत्तराचा तास हाणून पाडला. या गोंधळातच भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी महापालिका क्षेत्रात जुन्या इमारतींवर अनधिकृत मजले उभारल्याचा प्रश्न उपस्थित केला. पूर्व परवानगी न घेताच जुन्या इमारतींवर मजले बांधले जात असून, त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असून अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या आरोपाला उत्तर देताना फडणवीस यांनी त्यातील काही बाबी योग्य असल्याचा निर्वाळा देत जुन्या इमारवींवर अनधिकृतपणे मजले बांधले जात असल्याचे मान्य केले. अशी १९५ प्रकरणे निदर्शनास आली. या सर्व १९५ भोगवटाधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियमातील कलम ५२ ते ५५ अन्वये नोटिसा देण्यात आल्या असून, ७४ भोगवाटधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. इतर भोगवटाधारकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्यास विलंब किंवा दिरंगाई केल्याचे आढळून आले आणि दोष सिद्ध झाल्यास अशा अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे फडणवीस यांनी मान्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 10:17 am

Web Title: action on officers
Next Stories
1 वाहतूक कोंडीमुळे नागपूर ठप्प
2 ई-सेवांना ना गती, ना सोय!
3 प्रत्येक नागरिकाकडे ‘हेल्थकार्ड’, रुग्णांची माहिती ‘ऑनलाईन’ हवी
Just Now!
X