२४ तासांत ६ मृत्यू; १,१५२ नवीन रुग्ण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६ करोनाबाधितांचा मृत्यू तर १ हजार १५२ नवीन रुग्णांची भर पडली.  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल ९ हजार २९५ रुग्णांवर पोहोचल्याने चिंता वाढली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ७ हजार ६३१, ग्रामीण १ हजार ६६४ असे एकूण ९ हजार २९५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांतील ६ हजार ६३७ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे  रुग्णालयांत दाखल असलेल्यांची संख्याही १ हजार ५०६  वर पोहोचली आहे.  शहरात दिवसभरात ८९७, ग्रामीण २५२, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण १ हजार १५२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या नवीन बाधितांची संख्या १ लाख २१ हजार ८८४, ग्रामीण २९ हजार ९७७, जिल्ह्य़ाबाहेरील ९५१ अशी एकूण १ लाख ५२ हजार ८१२ रुग्णांवर पोहोचली आहे.  २४ तासांत शहरात २, ग्रामीणला १, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ६ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८१३, ग्रामीण ७७५, जिल्ह्य़ाबाहेरील ७६९ अशी एकूण ४ हजार ३५७ रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात ६९५ व्यक्ती करोनामुक्त

शहरात दिवसभरात ५४८, ग्रामीण १४७ असे एकूण ६९५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख १२ हजार १८२, ग्रामीण २६ हजार ९७८ अशी एकूण १ लाख ३९ हजार १६० व्यक्तींवर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत जिल्ह्य़ात करोनामुक्तांचे प्रमाण ९१.०७ टक्के आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण १० टक्क्यांवर

शहरात बुधवारी दिवसभरात ७ हजार ४२६, ग्रामीण ४ हजार ३२४ अशा एकूण ११ हजार ७५० चाचण्या झाल्या. ही संख्या मंगळवारी जिल्ह्य़ात ११ हजार ४४६ होती. त्यातील बुधवारी १ हजार १५२ अहवाल सकारात्मक आल्याने येथील चाचण्यांतील सकारात्मक अहवालाचे प्रमाण १०.०६ टक्के नोंदवले गेले.