अकरा दिवसानंतर रुग्णसंख्या सहा हजारांहून खाली; २४ तासांत ८९ मृत्यू; नवीन ५,६५० रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात सलग चौथ्या दिवशीही करोना  रुग्णांची मृत्यूसंख्या नव्वदहून खाली नोंदवली गेली. १५ एप्रिलनंतर प्रथमच दैनिक  रुग्णांची संख्या सहा हजारांहून खाली नोंदवल्या गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. २४ तासांत जिल्ह्य़ात ८९ नवीन करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू तर नवीन ५ हजार ६५० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.

नागपूरच्या शहरी भागात १५ एप्रिल २०२१ रोजी ३ हजार ४५८, ग्रामीण २ हजार ३५०, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण जिल्ह्य़ात ५ हजार ८१३ करोना  रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली होती. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्य़ात सात ते आठ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत होते. त्यामुळे चिंता वाढली असतानाच गेल्या २४ तासांत  शहरात ३ हजार ६६०, ग्रामीण २ हजार १८२, जिल्ह्य़ाबाहेरील १० असे एकूण ५ हजार ८५० रुग्ण आढळले. त्यामुळे आंशिक दिलासा मिळाला आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ७७ हजार ५५५, ग्रामीण १ लाख १ हजार २२३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २०२ अशी एकूण ३ लाख ७९ हजार ९८० रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ५४, ग्रामीण २५, जिल्ह्य़ाबाहेरील १० अशा एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ३०१, ग्रामीण १ हजार ७०४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २० अशी एकूण ७ हजार २५ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात ३ हजार ७७२, ग्रामीण २ हजार १४९ असे एकूण ५ हजार ९२१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख २६ हजार १२२, ग्रामीण ६९ हजार ४९५ अशी एकूण २ लाख ९५ हजार ६१७ व्यक्तींवर पोहोचली आहे.

विदर्भात करोनाचे २७४ मृत्यू

विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ात पुन्हा मृत्यूसंख्या  वाढली आहे. २४ तासांत येथे २७४ करोना रुग्णांचा मृत्यू तर १३ हजार ६०० नवीन रुग्णांची भर पडली आहे. यवतमाळमध्ये दिवसभरात आजपर्यंतच्या सर्वाधिक ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५४, ग्रामीण २५, जिल्ह्य़ाबाहेरील १०, असे एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. येथे २४ तासांत ५ हजार ८५० नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २२ रुग्णांचा मृत्यू तर ७३२ रुग्ण, अमरावतीत १० मृत्यू तर ८६९ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ५२९ रुग्ण, गडचिरोलीत १३ मृत्यू तर २७२ रुग्ण, गोंदियात १७ मृत्यू तर ६०३ रुग्ण, यवतमाळला ४५ मृत्यू तर १ हजार ३२३ रुग्ण, वाशीमला ४ मृत्यू तर ३५२ रुग्ण, अकोल्यात १६ मृत्यू तर ३७१ रुग्ण, बुलढाण्यात ८ मृत्यू तर ९८३ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २७ मृत्यू तर ७१६ नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, रुग्णसंख्या बऱ्याच दिवसांनी १४ हजारांच्या खाली गेल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे. विदर्भातील एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३२.४८ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

१३७ मे.टन प्राणवायूचा साठा उपलब्ध

नागपूर शहर व जिल्’ाला प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने  जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्’ात रविवारी ३७.५८ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांवर उपचार करणाऱ्या डेडिकेटेड कोविड  रुग्णालयांना दररोज सरासरी १४८ मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागते. तसेच विभागातील इतर जिल्’ांना ५० टन ऑक्सिजन या यानुसार विभागासाठीचे नियोजन करण्यात आले आहे, विभागातील तसेच शेजारच्या जिल्’ातील इस्पात उद्योगातून जास्तीत जास्त प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागपूर जिल्’ासाठी आज ७८ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. नागपूर जिल्’ात रविवारी सायंकाळपर्यंत १३७.५ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नोडल अधिकारी सतीश चव्हाण यांनी दिली. दरम्यान, प्राणवायूच्या पुरवठय़ासाठी १५ टँकरचा वापर करण्यात येत आहे. टॅक्स एअरमार्फत  बाहेरील राज्यातून टँकरद्वारा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

पालकमंत्र्यांवर शस्त्रक्रिया

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते जिल्ह्य़ातील करोना स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या स्विय सहायकाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. तरी देखील ते नागपूर जिल्ह्य़ातील प्राणवायू पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि विविध रुग्णालयात खाटा वाढवणे तसेच प्राणवायूचे प्लॉन्ट लावण्याच्या पर्यायाचा आढावा घेत आहेत.

सिम्बॉयसिस, अग्रेसेन भवनात कोविड केंद्र

वाठोडय़ातील सिम्बॉयसिस विद्यापीठ, गांधीबाग आणि रविनगर चौकातील अग्रेसन भवन येथे कोविड के अर केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिके च्यावतीने देण्यात आली  आहे. करोनाचे रुग्ण सर्वच ठिकाणी वाढत आहेत. नागपूरमध्ये आरोग्य सुविधा अधिक असल्याने इतर जिल्ह्य़ातील रुग्णही नागपूरमध्ये येऊ लागले आहेत, त्यामुळे  नागपूरमध्ये  कोविड के अर केंद्र वाढवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन वाठोडा येथील सिम्बॉयसिस विद्यापीठ आणि गांधीबाग आणि रविनगर चौकातील अग्रेसने  भवन  येथे  कोविड के अर केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी वरील  जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तेथे  लवकरच कोविड केंद्राच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कळवले आहे.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४२४८९

फ्रंट लाईन वर्कर      -४३१३१

४५ अधिक  वयोगट    – ९२३६९

४५ अधिक कोमार्बिड     – ७३०८८

६० अधिक सर्व नागरिक – १,५५,७३९

एकूण  –  ४,०६,८१६

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक               – १८७१३

फ्रंट लाईन वर्कर            –  १११६८

४५ अधिक वयोगट          – ५९७९

४५ अधिक कोमार्बिड         – ६६१२

६० अधिक सर्व नागरिक   – २७३५०

एकूण –                           ६९८२२

 

संपूर्ण लसीकरण एकूण –  ४,७६,६३८

सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ७७ हजारांवर

शहरात ४६ हजार ९०१, ग्रामीण ३० हजार ४३७ असे एकूण ७७ हजार ३३८ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील ६८ हजार ४२२ रुग्ण गृहविलगीकरणात  तर गंभीर संवर्गातील ८ हजार ९१६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

चाचण्यांची संख्या घसरली

शहरात दिवसभरात  १४ हजार ७७०, ग्रामीणला ४ हजार २२७ अशा एकूण १८ हजार ९९७  चाचण्या झाल्या असून त्याचा अहवाल मंगळवारी अपेक्षित आहे. परंतु रविवारी चाचणी झालेल्या २४ हजार ७०१ नमुन्यांत ५ हजार ८५० रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. हे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २३.६८ टक्के आहे.

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत याची माहिती  http://www.nmcnagpur.gov.in  व   http://nsscdcl.org/covidbeds वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आय.सी.यू. प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा ३९ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा ३३ उपलब्ध होत्या.