21 January 2019

News Flash

जावयाने केली सासूसह तिघांची हत्या

सैयद फिरोज रझाकची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी होती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. रझाकची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात जावयाने कौटुंबिक वादातून सासू, सासरे आणि मेव्हण्याची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

सैयद फिरोज रझाकची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी होती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. रझाकची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. हाच राग त्याच्या मनात होता. बुधवारी रझाक बाळापूरमधील आबादनगर येथे पत्नीच्या घरी गेला. रझाकचा पत्नीच्या कुटुंबीयांशी वाद झाला. तिथे त्याने कुऱ्हाडीने सासरे मेहबूब खान, सासू शबाना मेहबूब खान व मेव्हणा फिरोज मेहबूब खान या तिघांची हत्या केली.

रझाक हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. याप्रकरणी बाळापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्या केल्यानंतर तो बार्शिटाकळी येथे लपून बसल्याची पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी त्याला पहाटे अटक केली.

First Published on May 17, 2018 5:18 pm

Web Title: akola man killed his father in law and to others in balapur