News Flash

दुप्पट भावाने मद्यविक्री

उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला केराची टोपली

उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला केराची टोपली

नागपूर : सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बारमधून मद्यविक्रीच्या परवानगीचा आदेश काढला असून बारमधून मद्यविक्री छापील किंमतीने करावी, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाचा आहे. तरी बारचालकांनी सर्रास दुप्पट भावाने मद्य विक्री केली.  टाळेबंदीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीत जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू राहतील. त्याशिवाय हॉटेल आणि बारमधून मद्याच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी दिलेली होती. मात्र याच्या अमंलबजावणी करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बारमधून मद्यविक्रीला परवानगी दिली नव्हती. मात्र सोमवारी दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी ठाकरे यांनी नव्याने आदेश काढत बारमधून मद्यविक्रीला परवानगी दिली. या आदेशाची प्रत समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी फिरली आणि सोमवारी बारच्या पुढे रांगा लागल्या. मात्र ग्राहकांची गर्दी पाहता बारचालकांनी मद्याची दुप्पट दराने विक्री करण्यास सुरु केली. अंबाझरी येथील पीपीज् गॅरेज बारमध्ये मद्यविक्री संदर्भात विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्याने मद्य मिळेल मात्र त्यासाठी दुप्पट दर द्यावे लागेल असे सांगितले.

यासंदर्भात उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता बारचालकांनी छापील किंमतीनेच मद्याची विक्री करावी, असे आदेश असल्याचे सांगितले. मात्र शहरात सोमवारी अनेक बारमधून दुप्पट दराने मद्याची विक्री सुरू असून उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाला हरताळ फासला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशप्रमाणे सोमवारपासून शहरातील बारमधून मद्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र बारचालकाने छापील किंमतीने मद्याची विक्री करावी. जादादराने विक्री करत असल्याची तक्रार येताच त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.

– प्रमोद सोनवणे, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:53 am

Web Title: alcohol selling at double rate of mrp in nagpur zws 70
Next Stories
1 सर्वाधिक करोनाग्रस्त ३१ ते ४० वयोगटातील
2 महिला आयोग, ‘विशाखा’ समित्यांकडून न्याय मिळण्याची खात्री नाही!
3 रेमडेसिवीरच्या साठेबाजीवर गदा
Just Now!
X