उपराजधानीत अनेकांना नि:शुल्क सेवा; रामटेकमध्ये नुकतीच राष्ट्रीय परिषद संपन्न

तरुण वयात मौजेखातर प्राशन केलेले मद्य, कालांतराने व्यसन होते. व्यक्तीने व्यसनावर नियंत्रण न ठेवल्यास कुटुंबावरच संकट कोसळते. मद्याच्या या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहे. या जीवघेण्या विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी  ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ ही संस्था संकटमोचकाचे कार्य करीत आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेची शाखा नागपुरातही आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

अतिमद्य सेवन हा एक आजार आहे. अशा आजारातून व्यक्तीला बरा करण्यासाठी कुणा औषधाची नव्हे तर मानसिकता बदलण्याची गरज असते. याच विचारातून अमेरिकेतील दोन पूर्वाश्रमीचे मद्यपी बॉब स्मीथ आणि बिल विल्सन यांनी ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. आज या संस्थेच्या जगातील १७५ देशात शाखा आहेत. भारतातही ही संस्था कार्य करीत असून नागपुरातही संस्थेचे अनेक प्रतिनिधी निस्वार्थपणे सेवा देतात. ही संस्था सरकारकडून कोणतेही अनुदान स्वीकारत नाही किंवा दानदात्यांकडून देणगी घेत नाही. संस्थेशी जुळलेल्या सदस्यांच्या अर्थसहाय्यातून संस्थेचे काम चालत असते. संस्था दरवर्षी ४६ बैठका घेत असून आजवर १० हजार मद्यपींना व्यसनमुक्त करण्यात यश मिळवले आहे. ही संस्था दारूमुळे उद्भवलेल्या आजाराविरोधात कार्य करते. या संस्थेची राष्ट्रीय परिषद नुकतीच रामटेक येथे पार पडली. या परिषदेला देशभरातील ३०० सदस्य उपस्थित होते. कुणालाही अतिमद्य सेवनाचा आजार असल्यास त्यांनी ९६२३०२०८००, ९६८९१८२३०१, ९६६५९०४९०८ आणि ७३०४४४१९९२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेचे सदस्य व मनोबल समूहाचे मुकेश यांनी केले.  संस्थेच्या नावानेच काम सुरू असल्याने सदस्यांचे छायाचित्र व नावही प्रसिद्ध करण्यास मनाई असून मुकेश यांनी केवळ स्वत:चे अपूर्ण नाव सांगितले, हे विशेष.