News Flash

शहा-भागवत यांच्यात तब्बल चार तास चर्चा

भागवत-शहा यांच्यात तब्बल साडेतीन तास झालेल्या चर्चेदरम्यान त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकीसोबतच आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

लोकसभेच्या निवडणुकीबाबत मंथन

ईशान्येकडील विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्षाची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची नागपुरातील संघ मुख्यालयात भेट घेतली. भागवत-शहा यांच्यात तब्बल साडेतीन तास झालेल्या चर्चेदरम्यान त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकीसोबतच आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

दुपारी १२ वाजता शहा यांचे नागपुरात आगमन झाले. त्यानंतर ते गडकरी यांच्या निवासस्थानी गेले व तेथून  संघ मुख्यालयात आले.  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे आदी नेत्यांसोबत शहा यांची चर्चा झाली. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपुरात ९ मार्चपासून आयोजित करण्यात आली आहे. यात संघ आणि संघाशी संबंधित विविध संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते. संघाची राजकीय शाखा म्हणून भाजपचे प्रतिनिधीही यात सहभागी होतात. या बैठकीत वर्षभर झालेल्या कामाचा आणि पुढील वर्षी करावयाच्या कामांचे नियोजन केले जाते. त्यानुसारअमित शहा यांनी सरसंघचालकांकडे भाजपाचे रिपोर्ट कार्ड सादर केले तसेच पुढील तीन वर्षांच्या नियोजनावरही चर्चा केली. अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण होत आहे त्या नेत्यांवर अंकुश ठेवावा, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली  तर, भारतीय मजदूर संघातर्फे सरकारविरोधात वक्तव्य केली जात आहे विहिपनेही एल्गार केला आहे संघाने त्यांची समजूत काढावी, अशी भाजपाची मागणी आहे. ईशान्येकडील राज्यात घवघवीत यश संपादन केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी भेट दिली व तेथे भोजनही घेतले. गडकरी यांच्याकडे त्रिपुरा राज्याचे प्रभारीपद आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चाही झाली.

भय्याजी जोशींसाठी भाजप आग्रही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाह पदासाठी निवड  केली जाणारआहे. , २०१२ व २०१५ मध्ये या सरकार्यवाह पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. या पदावर जोशी यांनाच कायम ठेवावे, अशी मागणी भाजप गोटातून होत आहे

कर्नाटकातही कमळच फुलेल – शहा

ईशान्येनंतर कर्नाटकातही आपली सत्ता येईल, असा दावा भाजपचे अमित शहा यांनी केला. डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी रविभवन येथून निघताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्रिपुरा व नागालँडमधील विजयानंतर कर्नाटकच्या निवडणुकीसाठी काय  व्यूहरचना राहणार आहे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुम्ही आताच लिहून ठेवा, कर्नाटकमध्येही भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 2:43 am

Web Title: amit shah meet mohan bhagwat bjp rss
Next Stories
1 पूर्वाचलच्या भाजप विजयात संघाच्या मराठी प्रचारकांचा निर्णायक वाटा
2 कुलगुरू संघ, भाजपच्या दबावात काम करतात!
3 सावधान! रासायनिक रंगामुळे डोळ्यांना धोका
Just Now!
X