News Flash

‘फॉम्र्युला वन’ स्पर्धा म्हणजे वेगासोबत मैत्री, भारतीयांना उधुवत करणार!

वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांना या स्पर्धेचे आकर्षण होते.

‘फॉम्र्युला वन’ स्पर्धा म्हणजे वेगासोबत मैत्री, भारतीयांना उधुवत करणार!

 

अंशुल शहांचा मानस, लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छ भेट

एकाग्रता, ध्येय व वेगासोबतच वेळेचे योग्य नियोजन करून जगातील सर्वात वेगवान अशा ‘फॉम्र्युला वन’ स्पध्रेत सहभागी झालेल्या विदर्भातील एकमेव अंशुल शहा यांनी ‘वोल्क्सवॅगन पोलो- आर कप’ २०१४ मध्ये भारतातून तिसरे स्थान प्राप्त केले. फॉम्र्युला फोर्ड १६०० मध्ये ते पहिल्या १० मध्ये होते. आता ते २०१६ मध्ये होणाऱ्या एमआरएफ फॉम्र्युला २००० स्पर्धेमध्ये वेगासोबत मैत्री करण्यास सज्ज होत असून यात पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या खेळाबाबत भारतीयांना जागृत करण्याचा मानस त्यांनी लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केला.

वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांना या स्पर्धेचे आकर्षण होते. या आकर्षणापोटी त्यांनी दिल्ली गाठली. तेथे रेसिंग स्कूलमध्ये फॉम्र्युला कारचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतात स्पर्धा घेणाऱ्या जे.के टायर्स आणि एमआरएफ या दोन कंपनीच्या निवडीमध्ये यश संपादित केले. त्यांनी पहिल्यांदा ‘वोल्क्सवॅगन पोलो आर-कप रेसिंगमध्ये सहभागी होण्याच्या चाचणीत भारतातून आलेल्या १२०० स्पर्धकांवर मात करीत अंतिम ३० मध्ये स्थान निश्चित केले. अंतिम १२ मध्ये स्थान मिळविण्यात यश मिळाले. अन् २०१३ मध्ये नॅशनल चॅम्पियनशिप चाचणीत तिसरे स्थान मिळविले.

फॉम्र्युला वनमध्ये प्रवेश घेणे माझ्यासाठी स्वप्न आहे. मात्र ते सहज शक्य नाही. कारण ही स्पर्धा महाग आहे. तसेच कोणी थेट या स्पध्रेत सहभागी देखील होऊ शकत नाही. फॉम्र्युला चार, तीन, दोनमध्ये जागतिक मानांकनाच्या बळावर फॉम्र्युला वनसाठी निवड होत असते. त्यामुळे खालच्या होत असलेल्या स्पध्रेतील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावरच तुम्ही या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. भारतात केवळ दिल्ली येथील नोएडा, चेन्नई आणि कोईम्बतूर येथे ‘रेसिंग ट्रॅक’ आहे. त्यामुळे मला दर महिन्यात सरावासाठी नेहमी जावे लागते. २०१४ मध्ये मी फॉम्र्युला फोर एलजीबीचे प्रशिक्षण पूर्ण केले. आता मी एमआरएफ फॉम्र्युला फोर्ड १६०० चा सराव करत आहे. पूर्वी भारतात फॉम्र्युला वन ला खेळाचा दर्जा प्राप्त नव्हता. मात्र या खेळाला ‘सी’ग्रेडचा दर्जा देण्यात आला. ज्यामध्ये सरकारकडून कोणतीच मदत मिळत नाही. ही एक शोकांतिकाच आहे. खेळ महागडा असल्याने प्रायोजकांच्या बळावर मी इतपर्यंत मजल मारू शकलो. मात्र मला फॉम्र्युला स्पर्धेबाबत भारतीयांमध्ये जागृती करायची आहे. २०११ मध्ये दिल्ली येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सíकट’वर पहिल्यांदा फॉम्र्युला वन रेस झाली होती तब्बल दीड लाख प्रेक्षकांनी त्याचा आनंद लुटला. तेव्हा येवढय़ा मोठय़ा प्रमाणात भारतीयांमध्ये याची आवड असताना देखील सरकारची इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धा खूप कठीण

फॉम्र्युला वन कार स्पर्धा पूर्ण करण्याची कमाल सर्वानाच जमेल असे नाही. त्यासाठी भरपूर सराव अन् वेगाचे नियोजन करावे लागते.‘वोक्सवॅगन’ पोलो-आर कपमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर ‘फाम्र्युला फोड १६००’मध्ये अंतिम १२ स्पर्धकांत निवड करण्यात आली होती. यातील अन्य ११ स्पर्धकांनी यापूर्वी यात भाग घेतला होता. सहभागी अन्य स्पर्धकांनी कोंडी केल्यामुळे मागे पडलो. यातच समोरच्या कारला अपघात झाला. यामुळे अन्य कारचालकांचा तोल गेल्याने सारे स्पर्धक पहिल्या फेरीत बाहेर झाले. व्यावसायिक व जागतिक पातळीवर आयोजित केली जाणारी ही स्पर्धा खूप कठीण आहे. येथील एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते, याची जाणीव आहे, असे अंशुल शहा यांनी सांगितले.

सर्वात कमी वयाचा खेळाडू

वोल्क्सवॅगन पोलो-आर कप या स्पध्रेत भाग घेणारे अंशुल शहा हे सर्वात कमी वयाचे खेळाडू होते. फाम्र्युला फोर्ड १६०० मध्येदेखील सर्वात लहान वयाचा खेळाडू असण्याचा मान त्यांनी कायम राखला आहे. देशातील सर्वात मोठय़ा व आंतरराष्ट्रीयस्तराच्या ‘बुद्ध इंटरनॅशनल सíकट’ या मदानावरील स्पध्रेत त्यांनी पहिल्याच स्पध्रेत मिळविले. या यशामुळे उत्साह वाढला असून मोठी िहमत आली आहे, असे  अंशुल शहा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 1:10 am

Web Title: anshul shah racer
Next Stories
1 क्रीडा साहित्य घोटाळ्यात खोपडे, कुंभारेंसह १०९ जणांवर आरोप निश्चित
2 विद्यमान सरकारचेही राज्यपालांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष
3 समुपदेशकांकडे विवाहबाह्य़ संबंधांच्या तक्रारींचा ओघ!
Just Now!
X