News Flash

शहिदांच्या पाठीशी संपूर्ण देश, बलिदान व्यर्थ जाणार नाही

कारगिल विजय दिवस समारंभात आशीष शेलार यांचे प्रतिपादन

कारगिल विजय दिवस समारंभात आशीष शेलार यांचे प्रतिपादन

नागपूर  : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी वीस वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, देशातील १४० कोटी जनता त्यांच्यासोबत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशीष शेलार यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भोसला मिलिटरी स्कूलद्वारा आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, शैलेश जोगळेकर, सूर्यरतन डागा, कर्नल (सेवानिवृत्त) जे. एस. भंडारी, कुमार काळे, अजय शिर्के उपस्थित होते.

कारगिल युद्धानंतर आता कोणतेही शत्रूराष्ट्र वा संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देश तो हल्ला कदापिही सहन करणार नाही. तो हल्ला परतवून लावेल, असा विश्वास  शेलार यांनी व्यक्त केला.

भोसला मिलिटरी स्कूलमधून लष्करी शिस्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून मिळणारे प्रशिक्षण, ती शिस्त इथेच मिळते आहे. त्यामुळे उद्याच्या भारतीय लष्कराचे नेतृत्व या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नक्कीच केले जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. ५१४ कॅडेसनी शानदार परेड सादर केली. दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या परेडने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:56 am

Web Title: ashish shelar presents at the kargil victory day ceremony 2019 zws 70
Next Stories
1 ‘निर्माण’च्या ३५० विद्यार्थ्यांची ग्रामीण भागात पूर्णवेळ सेवा
2 भारताने २०१६ पूर्वी कधीच सर्जिकल स्ट्राईक केला नाही
3 राष्ट्रीय खाण आरोग्य संस्थेच्या विलीनीकरणास खा. धानोरकरांचा विरोध
Just Now!
X