07 March 2021

News Flash

काळविटांच्या अधिवासावर अतिक्रमण

वर्षभरात सुमारे दीडशे मृत्यू; कृती आराखडा आवश्यक

वर्षभरात सुमारे दीडशे मृत्यू; कृती आराखडा आवश्यक

नागपूर : राज्यात काळविटांच्या संवर्धनासाठी काही क्षेत्र संरक्षित केले आहे. मात्र, या संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त असणाऱ्या काळविटांच्या अधिवासावर वृक्षलागवड आणि अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. परिणामी काळविटांनी त्यांचा मोर्चा मानवी वस्तीत वळवल्याने गेल्या वर्षभरात राज्यात किमान १५०-१७५ काळविटांचा मृत्यू झाला आहे.

काळविटांसाठी देऊळगाव-रेहेकु री आणि कारंजा सोहोळ ही अभयारण्ये घोषित करण्यात आली. ममदापूर आणि येडशी रामलिंग येथेही काळविटांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही मोठय़ा संख्येने काळवीट आहेत. केवळ वनखात्याच्या अखत्यारित हे क्षेत्र येत नसल्याने त्यांचा अधिवास संवर्धनाअभावी नाहीसा होत आहे. वाघाप्रमाणेच काळवीटदेखील अनुसूची एकमध्ये येणारा प्राणी आहे. निसर्ग संवर्धनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘आययुसीएन’च्या लाल यादीत धोकादायक या वर्गात त्याची नोंद आहे.  पाच वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात ५० हजारच्या आसपास काळवीट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अधिवास हरवल्याने पाण्याच्या शोधात काही काळविटांनी मानवी वस्तीत प्रवेश केला. नागपुरातील हुडके श्वर परिरात दोन-तीन वर्षांपूर्वी मोठय़ा संख्येने काळविटांचे कळप दिसून येत होते. राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने पाण्यासाठी महामार्ग ओलांडण्याऱ्या अनेक काळविटांचा अपघातात मृत्यू झाला.   वाघाच्या संवर्धनाप्रमाणेच काळविटाच्या संवर्धनासाठी देखील कृती आराखडा तयार असणे गरजेचे आहे. अन्यथा रस्ते अपघातात त्यांच्या मृत्यूची संख्या वाढत राहील, अशी भीती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी व्यक्त के ली.

शेतात आसरा..

काही दिवसांपूर्वी गोंदिया शहरात काळवीट शिरले होते. काही महाभागांनी वनखात्याला त्याची सूचना देण्याऐवजी दुचाकीने त्याचा पाठलाग करत कित्येक किलोमीटर पळविले. एका ठिकाणी भिंतीला धडकू न त्याचा मृत्यू झाला. गोंदियासह अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्य़ातील त्यांचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे काळविटांनी शेताचा आसरा घेतला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी त्यांना मारण्याची परवानगी मागितली आहे.

मुख्य कारण..

काळविटांच्या अधिवासात कायम गवत असणे महत्त्वपूर्ण असताना त्यावर सागवान, बाभूळ, बांबू यांची लागवड करण्यात येत आहे. काही अधिवासांवर अतिक्रमणे झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:42 am

Web Title: at least 150 to 175 antelope die in the maharashtra during the year zws 70
Next Stories
1 झणझणीत ‘सावजी’चा तोटाही कोटींच्या घरात
2 वर्ध्यामध्ये बँकेच्या वेळापत्रकात बदल
3 टाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण
Just Now!
X