News Flash

स्टारबस चालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न?

कळमेश्वर ते सीताबर्डी दरम्यान धावणाऱ्या एका स्टारबसमध्ये रात्री  एकच महिला प्रवास करीत होती.

संग्रहित छायाचित्र)

नागपूर : मद्यधुंद अवस्थेतील स्टारबस चालक व वाहकांनी मिळून महिला प्रवाशाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी  पोलिसांचे बॅरिकेटिंग तोडून पळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर पोलीस मुख्यालयाजवळ घडली.

कळमेश्वर ते सीताबर्डी दरम्यान धावणाऱ्या एका स्टारबसमध्ये रात्री  एकच महिला प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये एक चालक व दोन वाहक होते. तिघेही मद्यधुंद होते. बसमध्ये महिला एकटीच असल्याचे  तिचे अपहरण करण्याचा चालक व वाहकांचा प्रयत्न होता.  त्यांनी  पोलीस मुख्यालयातील गॅस गोदामाजवळ लावलेले बॅरिकेटही तोडले. परंतु बसचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला धडकली व थांबली. बसमध्ये केवळ एकटी महिला दिसल्याने लोकांना संशय आला. त्यांनी चालक व वाहकांना पकडून बेदम मारहाण केली. काही वेळात वाहतूक पोलीस व गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चालक व वाहकांची लोकांच्या तावडीतून सुटका केली. बस चालकांच्या अशा कृत्यामुळे  सामाजिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:11 am

Web Title: attempted abduction of a woman by a starbus driver zws 70
Next Stories
1 खोटी माहिती दिल्याचे माहीत असूनही ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार
2 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ व्यक्तींचा बळी
3 ‘एसआयएसी’ पूर्वतयारी प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 
Just Now!
X