News Flash

इंधन दरवाढीचा फटका, ऑटो प्रवास महागला..

पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम ऑटोरिक्षांच्या प्रवास दरावरही झाला

प्रतिनिधिक छायाचित्र

नागरिकांच्या खिशावर ताण

 नागपूर : पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम ऑटोरिक्षांच्या प्रवास दरावरही झाला असून ऑटोरिक्षा चालकांनी  प्रवास भाडय़ात मोठी वाढ केली आहे. ऑटोने रोज प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर यामुळे ताण वाढला आहे.

शहरात १२ ते १३ हजार प्रवासी ऑटोरिक्षांना ‘आरटीओ’ने परवाने दिले आहेत. शहरात मीटर ऐवजी प्रवास भाडे शेअर करून ऑटो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.  निश्चित मार्गावर धावणारे ऑटो विविध ठिकाणाहून प्रवासी घेतात. प्रवासाच्या अंतरानुसार त्यांचे प्रवास भाडे ठरते. बर्डीवरून मानेवाडा, बसस्टॅन्ड, रेल्वेस्थानक, रामेश्वरी, पारडी, गांधीबाग, रविनगर, हिंगणा रोड, सोमलवाडा, गिट्टीखदान भागासह इतरही काही भागात पूर्वी ऑटोचा प्रति प्रवाशी भाडे १० ते १५ रुपये भाडे होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून  पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ऑटोचालकांनी प्रति प्रवासी पाच रुपयांनी दर वाढल्याची माहिती आहे.

‘‘ गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढल्याने ऑटोरिक्षा चालकांनी  प्रती प्रवासी सुमारे पाच रुपये दरवाढ केली आहे.’’

– विलास भालेकर, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:31 am

Web Title: autorickshaw fares increase in nagpur due to fuel price hike
Next Stories
1 नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट ; एकाचा मृत्यू
2 सात लाख वीजग्राहकांकडे काळ्या यादीतील कंपनीचे मीटर
3 ‘क्रेझी केसल’मध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर!
Just Now!
X