भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिक्षू कक्षाला लागलेल्या आगीच्या घटनेचा चौकशी अहवाल घटनेच्या अकरा दिवसानंतर चौकशी समितीने मंगळवारी शासनाकडे सादर कला. या अहवालात ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे म्हटले असून याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक व इतर संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या चौकशी समितीने काही उपाययोजनाही सूचवल्या आहेत. ८ जानेवारीला मध्यरात्रीनंतर ही घटना घडली होती व त्यात दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.