प्रकल्पातून महापालिकेला ३१ कोटींचे उत्पन्न

महापालिकेने भांडेवाडी येथील सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्पाची क्षमता २०० वरून ३०० दशलक्ष लिटर्स (एमएलडी) करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महापालिकेला ३१ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

शहरात दररोज निर्माण झालेले ४०० एमएलडी सांडपाणी पुढे नाग, पिवळी नदीत सोडले जाते. तेथून हे पाणी गोसेखुर्द प्रकल्पापर्यंत पोहोचते. त्यामुळे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी भांडेवाडी येथे सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. तेथे पूर्वी १०० एमएलडी सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया होत होती. त्यानंतर आता  १०० एमएलडी पाण्यावर पुनप्र्रक्रिया केली जाते. प्रकल्पाची क्षमता ३४० एमएलडी आहे.त्यामुळे आता अतिरिक्त १०० एमएलडी सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

सध्या कोराडी येथील महावितरण केंद्रास १०० एमएलडी तसेच खापरखेडा महावितरण केंद्रास ५० एमएलडी पुनप्र्रक्रिया केलेले पाणी दिले जात आहे. यातून महापालिकेला १५ कोटीचे उत्पन्न मिळत आहे.  या प्रकल्पाची क्षमता वाढवून पुढील काळात मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पास १००एमएलडी पाणी विकत देण्याचे प्रस्तावित आहे.

प्रस्तावानुसार अतिरिक्त १०० एमएलडी प्रतिदिन क्षमता वाढवण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च, देखभाल दुरुस्ती जुन्या करारनाम्याच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येईल. याशिवाय महापालिकेने ५ एमएलडी प्रति दिन क्षमतेचे २ लघु मलनि:सारण केंद्र उभारले आहे.