News Flash

अपयशाच्या भीतीने निवडणूक लांबणीवर?

आयोगाने जि.प. निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली असून त्यात बुटीबोरीचा समावेश आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळण्याची शक्यता नसल्याने भाजपने या निवडणुकाच लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एक वर्षांपूर्वी निवडणुकांच्या तोंडावर वाडीला नगर पालिकेचा दर्जा देऊन निवडणुका लांबवल्या आणि आता नव्याने निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली असता पुन्हा जि.प.चा एक मतदारसंघ असलेल्या बुटीबोरीला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे.

आयोगाने जि.प. निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली असून त्यात बुटीबोरीचा समावेश आहे. या गणाला नगर पालिकेचा दर्जा मिळाल्याने तो बाद होईल. त्यामुळे  एकूण आरक्षित मतदारसंघांची संख्या कमी होईल. त्यामुळे रचना करावी लागले. याला विलंब होऊ शकतो. दरम्यान या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले गेले तर पुन्हा निवडणुका लांबणीवर पडू शकतात. असे व्हावे म्हणूनच भाजपने शासनाच्या माध्यमातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर बुटीबोरीला पालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र ही बाब फेटाळून लावली असून शासनाच्या निर्णयाने जि.प. निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेवर गत दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ एकवर्षांपूर्वीच संपला. राज्यातील जि.प. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. आयोगाने आरक्षित मतदारसंघही जाहीर केले होते. मात्र ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासनाने वाडी या जि.प. गणाला नगरपालिकेचा दर्जा दिला. त्यामुळे आरक्षित मतदारसंघाचे समिकरण बिघडले. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे जि.प. निवडणुका होऊ शकल्या नाही, त्यामुळे सरकारने त्याला मुदतवाढ दिली. एक वर्षांने आता पुन्ही हीच प्रक्रिया आयोगानेसुरू केली असता आता सरकारने बुटीबोरीला नगरपालिकेचा दर्जा दिला.

नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने येथे भाजपला सत्ता राखणे आवश्यक आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात विशेषत: शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत कमालीची नाराजी असल्याने आत्ता निवडणुका झाल्यास पक्ष बहुमत मिळवू शकणार नाही, असे पक्षाला वाटते. सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार भाजपनेच याबाबत केलेल्या सर्वेक्षणातून असे संकेत प्राप्त झाले आहेत. ही बाब लक्षात घेता भाजपने या निवडणुका कशा पुढे ढकलता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

बुटीबोरीला नगर पालिकेचा दर्जा देण्याचा शासनाच्या निर्णयाने नागपूर जि.प. निवडणुकीसाठी घोषित केलेल्या आरक्षणाला कोणताही परिणाम होणार नाही.

– चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:38 am

Web Title: bjp attempt to postpone nagpur zilla parishad elections
Next Stories
1 अर्थसाक्षर वर्गाला संघाशी जोडण्याचे प्रयत्न
2 फाईल्स डिजिटल, ब्रेल लिपित नसल्यामुळे अंध अधिकाऱ्यांना सहायकाची आवश्यकता
3 पाणी टंचाईवर कोरडी चर्चा, निर्णय नाही
Just Now!
X