13 August 2020

News Flash

पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर भाजप नेते विदर्भाच्या आंदोलनात

सोमवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे  विदर्भ राज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी धरणे देण्यात आले.

जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनात सहभागी भाजपचे खासदार अशोक नेते, विदर्भवादी नेते वामनराव चटप, अ‍ॅड. निरज खांदेवाले

दिल्लीतील धरणे आंदोलनात खा. नेतेंची उपस्थिती

नागपूर : सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देऊन महाराष्ट्रात पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने या काळात या मुद्याकडे सोईस्कर पाठ फिरवली. आता राज्यातील सत्ता गेल्यावर पाच वर्षांनंतर प्रथमच पक्षाचे नेते विदर्भाच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत.

सोमवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे  विदर्भ राज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी धरणे देण्यात आले. यावेळी भाजपचे गडचिरोलीचे खासदार अशोक नेते विदर्भवाद्यांसोबत हजर होते. पाच वर्षांनंतर प्रथमच ते उघडपणे विदर्भाच्या आंदोलनात आले. खासदार नेते यांनी यापूर्वी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी संसदेत खासगी विधेयक मांडले होते. स्वतंत्र विदर्भासाठी कायम संघर्ष करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विदर्भवादी व माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. निरज खांदेवाले, अमोल कठाणे, चंद्रशेखर बदकुले, अनिल जवादे, सिद्धार्थ इंगळे, अमोल बोराखडे, सनी तेलंग, वैभव लोणकर, रामकिशोर सिंगणधुपे, मोरेश्वर खडतकर, रंजना मामर्डे, महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांच्यासह विदर्भातील ३०० ते ३५० कार्यकर्ते उपस्थित होते. धरणे आंदोलनानंतर विदर्भ राज्य आघाडीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले. यात भाजपने भूवनेश्वर अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित केला होता याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्याची निर्मिती करताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्याची इच्छा होती. याचीही आठवण करून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 5:32 am

Web Title: bjp leaders agitation for separate vidarbha zws 70
Next Stories
1 अश्लील चित्रपट बघून ‘त्या’ बालिकेवर बलात्कार
2 ‘त्या’ पाऊलखुणा वाघाच्या नव्हे श्वानाच्या!
3 कळमना बाजारात कांद्याच्या भावात किंचित घसरण
Just Now!
X