विक्रमी मतदानाने ‘पदवीधर’च्या निकालाची उत्सुकता; आज मतमोजणी

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच मतदानाची टक्केवारी ६४ टक्क्यांपर्यंत गेल्याने सर्वच राजकीय पंडित अचंबित झाले आहेत. वाढीव मतदान भाजपच्या पथ्यावर पडणार की परिवर्तन घडणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. बुधवारी मानकापूर येथील क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडले. भाजपचे संदीप जोशी व महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी अशी थेट लढत आहे. सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार४५४ मतदारांपैकी १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या तुलनेत ३२ हजारांवर मतदान वाढले आहे.

नागपूरमध्ये १ लाख २,८०९ मतदारांपैकी, ६२,५८५ (६०.८८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात  ३२,७६१ मतदारांपैकी २२ हजार१०३ ((६७.४७ टक्के) मतदारांनी, त्यानंतर वर्धा जिल्ह्यात २३ हजार ६८ मतदार होते. यापैकी १५ हजार ६९ (६५.३२ टक्के), गोंदिया जिल्ह्यात१६ हजार९३४ पैकी १० हजार ७८३ (६३.६८टक्के), भंडारामध्ये १८,४३४ पैकी १३ ह जार ३७५ (७२.५६ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्यात १हजार ४४८ पैकी९००८ ( (७२.३७ टक्के) मतदारांनी मतदान केले.

कमी झालेले मतदान आजवर भाजपच्याच पत्थ्यावर पडले आहे. यावेळी मागच्या निवडणुकीच्या(३७ टक्के) तुलनेत टक्केवारी जवळजवळ दुपटीने वाढणे याचा सरळ अर्थ ते परिवर्तनासाठी झालेले मतदान आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी भाजपने मोठ्या संख्येने नवमतदारांची नोंदणी केली, त्यामुळे वाढीव मतदानाची काळजी आम्हाला नाही, असे या पक्षाचे नेते सांगत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघात भाजपच्या आजवरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या नागपूर शहरासह विभागातील इतरही जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली . विशेष म्हणजे, चंद्रपूर,वर्धा,गोंदिया हे  नागपूरनंतर सर्वाधिक मतदार असणारे जिल्हे आहेत व तेथे ओबीसी मुद्या अधिक प्रभावी होता.

हे येथे उल्लेखनीय. या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब  मोठ्या संख्येत असलेल्या दलित मतांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत ही मते एकगठ्ठा बसपाकडे वळली होती. यावेळी बसपा नसल्याने ती कुणाकडे गेले हे महत्त्वाचे आहे. वाढीव ३२ हजार मतदानात ही मते ही लक्षणीय आहेत व ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आंबेडकरी मतदारांचा कल निर्णायक ठरणार

शहरातील भाजप समर्थक असलेल्या भागांसोबतच आंबेडकरी विचारधारेचे लोक राहत असलेल्या परिसरात सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसून येत आहे. यावरून आंबेडकरी विचारधारेच्या पदवीधरांकडून उमेदवारांचे भवितव्य निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रातील मतदानाची आकडेवारी बघितल्यास भाजपचा पट्टा समजल्या जाणाऱ्या भागातील मतदान केंद्रावर एकू ण आठशे ते १२०० एकू ण मतदारापैकी  ५०० ते ६०० मतदारांनी मतदान के ले. हेच चित्र दक्षिण आणि उत्तर नागपुरातील आंबेडकरी विचारधारेचे लोक राहत असलेल्या केंद्रावर  दिसून आले. तेथे एकू ण आठशे ते हजार मतदारांपैकी ४०० ते ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून ते परिवर्तनाचे संके त आहेत. यावेळी निश्चित परिवर्तन पाहायला मिळेल. – अभिजित वंजारी (महाविकास आघाडीचे उमेदवार)

नागपूर पदवीधर हा भाजपचाच बालेकिल्ला होता आहे आणि पुढेही राहणार आहे. मतदारांनी कायम पक्षावरच विश्वास व्यक्त के ल्याने विजय निश्चित आहे. – संदीप जोशी (भाजप उमेदवार)