03 August 2020

News Flash

मुलांच्या ‘प्रतापा’मुळे खोपडेंच्या राजकीय अडचणीत वाढ

राज्यात सत्तांतर झाल्यावर गडकरीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांनी मोर्चेबांधणी केली होती.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे संशोधन

सुरुवातीला मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले आणि नंतर महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेले भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या राजकीय अडचणीत त्यांच्या मुलांनी सोमवारी केलेल्या ‘प्रतापा’मुळे वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपमध्ये खोपडे हे गडकरी समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यावर गडकरीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. ४० पेक्षा जास्त आमदारांना गडकरी वाडय़ावर नेऊन शक्तिप्रदर्शनही केले होते. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खोपडेंच्या या मोहिमेमुळे फडणवीस त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यामुळेच मंत्रिमंडळाची रचना सुरू असताना खोपडेंचे नाव अग्रस्थानी असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळाले. त्यानंतर त्यांना महामंडळाचे अध्यक्ष केले जाईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पक्षाच्या दक्षिण नागपुरातील बैठकीत जाहीर केले होते. यावेळी गडकरीसुद्धा उपस्थित होते. या घोषणेला आता दोन वर्षे झाली. खोपडेंनी आता महामंडळाचा नादही सोडला आहे. त्यानंतर त्यांच्याकडून शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्याचा विक्रम खोपडे यांच्या कार्यकाळातच नागपूर भाजपने केला होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले घवघवीत यश सुद्धा त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाले होते. असे असतानाही त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. त्याच वेळी पक्षात त्यांच्याविरुद्ध वारे वाहत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी), ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या कामाबद्दल खोपडे यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली होती. मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत ‘एनआयटी’ येत असल्याने खोपडेंच्या टीकेचा रोख हा मुख्यमंत्र्यांकडेच होता, असा संदेश यातून गेला होता.

आता मुलांनी केलेल्या ‘प्रतापा’मुळे खोपडे अडचणीत आले आहेत. मुलांच्या भांडणात एका तरुणाचा नाहक बळी गेल्याचे हे प्रकरण गंभीर आहे. बारमध्ये गोंधळ घालणाऱ्यांमध्ये पक्षाच्या आमदारपुत्रांचा समावेश असल्याने भाजपच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भाजपच वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आंदोलन करीत होती, आता त्यांच्याच नेत्यांची मुले गुंडगिरी करीत आहेत, असा आरोप केला जात आहे.

विशेष म्हणजे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने ते सुद्धा टीकेचे धनी होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पुढच्या काळात  खोपडेंचा राजकीय प्रवास सोपा नाही, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता भाजपमधीलच काही नेत्यांनी त्यांचे नाव न जाहीर करण्याच्या अटींवर वर्तविली आहे.

दोषी असेल तर कारवाई करा

सोमवारी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी केली जावी, यात मुले दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, मारहाणीच्या वेळी मुले तेथे नव्हती तरीही त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या ३०७ कलमाखाली कारवाई करण्यात आली हे अनाकलनीय आहे. ज्यांनी हत्या केली ते कुठेच चर्चेत नाही.

कृष्णा खोपडे, आमदार (भाजप), नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2016 5:10 am

Web Title: bjp mla krishna khopde political careers in danger
Next Stories
1 शिवसेना उमेदवार ११५ कोटींचा धनी
2 आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मूत्रपिंड प्रत्यारोपण समिती
3 स्वच्छतेच्या अभियानात महाराष्ट्र अव्वल – पंकजा मुंडे
Just Now!
X