29 November 2020

News Flash

भाजपच्या शहर कार्यकारिणीत नव्या-जुन्यांचा मेळ

सर्व सरचिटणीस बदलले; बंगाले, बोरकर, अंबुलकर, मित्रांना संधी

(संग्रहित छायाचित्र)

सर्व सरचिटणीस बदलले; बंगाले, बोरकर, अंबुलकर, मित्रांना संधी

नागपूर : भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके  यांनी आज पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर करताना जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ साधण्याचा

प्रयत्न के ला. पक्षातील महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या सरचिटणीसपदावर नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच

इतर पदांवर जुन्या कार्यकारिणीतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना समावेश करण्यात आला. एकू ण ६० टक्के नवीन तर ४० टक्के जुने पदाधिकारी असे कार्यकारिणीचे स्वरूप आहे. सुनील मित्रा यांच्याकडे संघटन सचिवांची जबाबदारी सोपवण्यात आली.

२०२२ मध्ये होणाऱ्या महापालिके च्या सार्वत्रिक निवडणुकीवर डोळा ठेवून कार्यकारिणी सर्वसमावेशक करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते.

महापालिकेच्या सार्वत्रिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आज जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. सरचिटणीसपदी नगरसेवक संजय बंगाले आणि नरेंद्र बोरकर, यांच्यासह सुनील मित्रा, रामभाऊ अंबुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रा यांच्याकडे सोपवण्यात आलेली संघटनाची जबाबदारी आश्चर्यकारक मानली जाते.

कोषाध्यक्षपदी राजेश बागडी आणि सहकोषाध्यक्षपदी नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा आणि आशीष मुकिम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आयटी सेलच्या प्रमुखपदी गिरीश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२१ उपाध्यक्ष  नियुक्त करण्यात आले. त्यात नगरसेवक अविनाश ठाकरे, भोजराज डुंबे आणि संदीप जावध, संदीप गवई, सुधीर राऊत, चेतना टांक, कीर्तीदा अजमेरा, कामील अंसारी, रमेश शिंगारे यांचा समावेश आहे.

शहर संपर्क प्रमुखपदी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली. यात प्रामुख्याने प्रमोद पेंडके, आशीष पाठक यांना संधी देण्यात आली आहे. सचिवपदी नगरसेवक बंटी कुकडे, निशांत गांधी,  सारिका नांदुरकर, विजय केवलरामानी, किशोर पेठे यांना आणि प्रसिद्धी प्रमुखपदी चंदन गोस्वामी यांची वर्णी लागली आहे. नगर कार्यकारिणी सदस्य १५२ आहेत.

विशेष निमंत्रित ३३ आहेत. कायम निमंत्रित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर अर्चना डेहनकर आहेत.

विविध आघाडींचे प्रमुख

महिला मोर्चा अध्यक्ष नीता ठाकरे, युवा मोर्चा अध्यक्ष पारेंद्र पटले, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष राजेश हातीबेड, अनु. जमाती मोर्चा अध्यक्ष रवी पेंदाम, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश चोपडे, दक्षिण भारतीय सेल संदीप पिल्ले यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:44 am

Web Title: bjp nagpur city executive committee declared zws 70
Next Stories
1 कर्जदार महिलेवर सावकाराकडून बलात्कार
2 ‘व्हीएनआयटी’ दुर्लक्षित; रिक्त पदांचे ग्रहण
3 ‘लॉगिन’ केल्यावर संदेश येतो, ‘आता कुठलाही पेपर नाही’!