निवडणुकीच्या तोंडावर क्रीडा स्पर्धाचे आयोजन; बक्षिसांची उधळण

शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील पाच महिन्यात नागपुरात महापालिका, जिल्हा परिषद व दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. अशात युवावर्ग तसेच मतदारांना आकर्षति करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवी शक्कल लढविली आहे. भाजपने शहरात व जिल्ह्य़ात अनेक क्रीडा स्पर्धाच्या आयोजनातून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धामध्ये भरगच्च बक्षिसांची खैरात वाटण्यात येत आहे.

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 
seat sharing formula of mahayuti and mahavikas aghadi
युती-आघाडीचे पहले आप! परस्परांच्या हालचालींवर लक्ष, जागावाटप रखडल्याने उमेदवारी याद्या लांबणीवर

राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय क्रीडा क्षेत्राचे पान हलत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी गेल्या काही महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र हे राजकीय नेत्यांच्याच रणधुमाळीचा अड्डा बनला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे फेब्रुवारी, मार्च दरम्यान होणाऱ्या महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका.

मात्र, दुर्दैवाने त्यामध्ये सामान्य खेळाडू व संघटना भरडले जात आहेत. सद्यस्थितीत मनपा आणि जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. साहजिकच ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप शर्थीचे प्रयत्न करेल. त्यासाठी यंदा भाजप नेत्यांनी छोटय़ा-मोठय़ा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचा सहारा घेतला आहे. खो-खो, कबड्डी, मॅरेथॉन दौड, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा निरनिराळ्या खेळ स्पर्धाचे आयोजन सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते करीत आहेत. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही या स्पर्धा घेणे सुरू आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच खेळामध्ये भाजपच्या नेत्यांची ढवळाढवळ दिसून येत आहे. एकीकडे राजकीय नेते क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये, असे सार्वजनिक किंवा खासगी समारंभात छातीठोकपणे सांगत असतात. मात्र, निवडणुका आल्या की त्यांना याचा विसर पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. इतर वेळी वर्षांनुवष्रे खेळ स्पर्धाच्या आयोजनापासून दूर असलेल्या भाजप नेत्यांना निवडणुका येताच खेळाडूंची काळजी वाटू लागली आहे.

क्रीडा संबंधित आलेल्या प्रलंबित प्रश्नांची आठवण या निमित्ताने सर्व नेते मंडळींना येऊ लागली आहे. नुकतेच शहरात राष्ट्रीय पातळीच्या खेळाचे झटपट आयोजन करून नागपूरकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तब्बल ४८ वर्षांंनंतर शहरात मनपाच्या वतीने राष्ट्रीय खो-खो घेण्याची युक्ती त्यांना यंदाच का सुचली हे देखील समजण्याची गरज आहे.

विशेष म्हणजे, निवडणुका बघता अनेक वर्षांपासून क्रीडा संकुल परिसरात तयार होत असलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या ट्रॅकसाठी येणारे सर्व अडथळे दूर करण्यात आले असून डिसेंबपर्यंत हा ट्रॅक पूर्णत्वास होण्याचे संकेत असून प्रचारादरम्यान याचाही उल्लेख भाजपकडून नक्कीच केला जाण्याचे बोलले जात आहे.

बक्षीस वितरणाला घोषणांची आतषबाजी

भारतीय जनता पक्ष सध्या क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. भरगच्च बक्षिसांची रक्कम देत युवावर्गाला आकर्षति करत पालकांसह सर्वसामान्यांचे लक्ष वेधत आहे. क्रीडा संघटनांच्या मदतीने सर्व आयोजन करून थाटत या स्पर्धाचे बक्षीस वितरण केले जात आहे. भरगच्च रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन निवडणुकीपूर्वी मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच बक्षीस वितरण सोहळ्याला बडय़ा नेत्यांना आमंत्रण देत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती देऊन घोषणांची आतषबाजी जाहीर भाषणातून केली जात आहे.