08 April 2020

News Flash

सांगतेपूर्वी राष्ट्रगीत म्हणून काँग्रेसचा बहिष्कार!

महापालिका सभेत सत्तापक्ष व विरोधकांत तीव्र संघर्ष

(संग्रहित छायाचित्र)

महापालिकेतील अस्थायी वाहनचालकांच्या विषय न्यायप्रविष्ट असताना तो सभागृहाच्या पटलावर आला कसा, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस सदस्यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तास सुरू असताना मध्येच राष्ट्रगीत सुरू करून सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. या मुद्यावरून सत्तापक्ष व विरोधकांत तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. तेव्हा काँग्रेसचे सदस्य कमलेश चौधरी यांनी महापालिकेतील अस्थायी वाहनचालकांच्या न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून माहिती विचारली. मात्र त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. यावर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे, नितीश साठवणे, बंटी शेळके, हरीश ग्वालबंशी यांनी प्रशासनाकडून कुठल्याच प्रश्नांची माहिती दिली जात नाही. तसेच चुकीची माहिती दिली जाते असा आरोप करत गोंधळ सुरू केला.

भाजप सदस्य वीरेंद्र कुकरेजा यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर चर्चा होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर चौधरी यांनी आक्षेप घेत वाहनचालकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर पटलावर आले कसे, असा प्रतिप्रश्न केला. पण प्रशासनाकडून कुठलेच उत्तर मिळत नव्हते. सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांकडून दावे प्रतिदावे सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीन साठवणे आणि बंटी शेळके सभागृहात उभे झाले त्यांनी राष्ट्रगीत सुरू केल्याने सर्वच सदस्य उभे झाले. यांनतर काँग्रेसच्या सदस्यांनी सत्तापक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत चक्क सर्वसाधारण सभेवर बाहिष्कार टाकला. त्यानंतरही पटलावरील अन्य विषयांवर कुठलीही चर्चा न करता ते मंजूर करण्यात आले. दरम्यान काँग्रेसने सभागृहाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोप करून सत्तापक्ष सदस्यांनी निषेध केला. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली.

सभागृहाचे कामकाज सुरू असताना महापौरांचा एक पाय बेलवर असतो. दरम्यान, ही बेल वाजवून महापौरांनी सूचना केल्यास संबंधित कामकाजाची नोंद काढून टाकण्यात येते. हा प्रकार सुरू असताना महापौर बसून होत्या व त्यांनी बेल वाजवल्याने संबंधित प्रकार कामकाजातून काढून टाकण्यात आल्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.

सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना त्यावर चर्चा सुरू होती मात्र, काँग्रेसच्या सदस्यांनी चर्चा सुरू असताना राष्ट्रगीत सुरू करणे हे सभागृहाच्या नियमाला धरून नाही. त्यांनी सभागृहाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. त्यामुळे संबंधित काँग्रेस सदस्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस देत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

– दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक

विरोधकांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून चुकीची माहिती दिली जात असेल. सदस्यांना बोलू दिले जात नसेल तर सभागृहात विरोधी पक्ष कशासाठी हवा. त्यामुळे सभागृहावर बहिष्कार टाकला आहे.

– तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 12:31 am

Web Title: boycott of the congress nagpur mahanagar palika abn 97
Next Stories
1 नागपुरात एकाच रात्रीत तीन खून, पोलिसांच्या कारभावर प्रश्नचिन्ह
2 जप्त स्कूलव्हॅनमधील विद्यार्थी वेठीस!
3 लोकजागर : पराभवाच्या छायेतही ‘राजकारण’!
Just Now!
X