सख्खा भाऊ पक्का वैरी अशी म्हण महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहित आहे. नागपूरात याच म्हणीचा प्रत्यय आला आहे. शुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाला भोकसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलवर गाणी वाजवण्यावरून उद्भवलेल्या भांडणातून भावानेच भावाला चाकूने भोसकले. ही घटना नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत सिंधी कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद देविदास धनवानी (४१) रा. सिंधी कॉलनी, खामला फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या घरी चेतन गौतम भट (३१) आणि पीयूष गौतम भट (२५ ) हे दोघे सख्खे भाऊ भाडेकरू आहेत.
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोबाईलवर गाणी वाजवण्यावरून दोन भावात भांडण झाले. यातच चेतनने पीयूषच्या पोटात चाकू भोसकला. पीयूषचा किंचाळण्याचा आवाज ऐकून विनोद मदतीसाठी धावले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 4, 2020 3:49 pm