News Flash

सख्ख्या भावाने केला बलात्कार, बहीण गर्भवती राहिल्याने उघड झाला प्रकार

चार महिन्यांपूर्वी दोघे घरी एकटे होते. नराधम भावाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

जीवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक व रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस नराधम भावाला ताब्यात घेतले आहे.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि तिचा भाऊ राहतो. दोघेही अल्पवयीन आहेत. चार महिन्यांपूर्वी दोघे घरी एकटे होते. नराधम भावाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो सतत तिच्यावर अत्याचार करत होता. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. हे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांनी मुलीची चौकशी केली असता सख्खा भाऊच अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले. अखेरीस आईने मुलीसह हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीही अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 11:33 am

Web Title: brother rapes miner sister in nagpur booked
Next Stories
1 बालसुधारगृहातील पदे आठ आठवडय़ात भरा
2 ‘न्यूजरिल’ आली, चित्रपट अजून बाकी आहे!
3 शहरविकासाची ‘निवडणूक भेट’!
Just Now!
X