नितीन गडकरींची वेस्टर्न कोलफिल्डला सूचना

कोळशावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी खाणीजवळील पडिक जागेचा वापर औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी करा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोफि) वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अ‍ॅग्रोव्हिीजन कृषी प्रदर्शनात आयोजित ‘कोल टू मिथेनॉल’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत आणि वेकोलिचे सरव्यवस्थापक मिश्रा यावेळी उपस्थित होते.

विदर्भात कोळशाच्या अनेक खाणी असून त्यातून बाहेर काढण्यात येणारा कोळसा कसा विकायचा, असा प्रश्न आता वेकोलिच्या व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. कोळशापासून युरिया तयार केला जाऊ शकतो, त्यादृष्टीने भद्रावती येथे एक प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे कोळशापासून मिथेनॉलही तयार होऊ शकते आणि त्याचा वापर इंधन म्हणून वाहनात करणे शक्य आहे. विदर्भातील कोळसा खाणींच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पडिक जमीन असून त्याचा वापर जर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी करता आला तर या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. यासंदर्भात आपण वेकोलिचे अधिकारी मिश्रा यांच्याशी चर्चा केली आहे, असे गडकरी म्हणाले. कोळसापासून युरिया तयार झाला तर तो मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल व त्याच्या किमतीही निम्म्याने कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त: दरात युरियाही उपलब्ध होईल. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

.. तर १०० अब्ज डॉलर्सची बचत -डॉ. सारस्वत

कोळसापासून मिथेनॉल तयार केल्यास देशाची १०० अब्ज डॉलर्सची बचत होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत म्हणाले. त्यांनी यावेळी ‘कोळसा ते मिथिनॉल’ यावर सादरीकरण केले. विविध वाहनांमध्ये मिथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेलला पर्याय ठरू शकते. ते पेट्रोलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे, असा दावाही त्यांनी केला. सध्या देशात वीजनिर्मितीसाठी कोळसा, पाणी आणि इतरही नैसर्गिक स्रोतांचा वापर केला जात आहे. यामुळे प्रदूषण तर वाढतेच, पण नैसर्गिक स्रोतही कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे यावर पर्याय

शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिथिनॉल हा त्यावरचा सवरेत्कृष्ट पर्याय आहे. त्याचा पेट्रोलिीयम पदार्थात मिश्रणासाठीही वापर केला जाऊ शकतो. तसेच त्यापासून तयार होणाऱ्या विविध रसायनांचाही वापर करता येऊ शकतो, लाकूड, कोळसा

किंवा बायोगॅसपासूनही मिथिनॉलची निर्मिती शक्य आहे. चीनमध्ये कोळशापासून मिथिनॉल तयार केले जात असून तेथे प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. भारतात १.५ मि.मे.टन मिथेनॉलची मागणी असून ०.३८५ मि.मे.टनच उत्पादन केले जाते, भारतात मिथेनॉल निर्मितीचे तीन प्रकल्प असून ते गॅसवर आधारित आहे, असे डॉ. सारस्वत म्हणाले.