News Flash

नगरसेविकेच्या कुटुंबीयांची दादागिरी

साकोरे कुटुंबीयांनी त्याला आपल्या कार्यालयात नेऊन पुन्हा अमानुष मारहाण केली.

किरपान (बसचालक )
  • रमना मारोती परिसरात बसचालकाला बेदम मारहाण
  • शहर बससेवा बंद, नगरसेविकेने आरोप फेटाळले

रमना मारोती परिसर, प्रभाग क्रमांक २८ च्या भाजप नगरसेविका व नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकुरे यांचा मुलगा व कुटुंबीयातील इतर सदस्यांनी महापालिकेच्या शहर बस (आपली बस) चालकाला केलेल्या अमानुष मारहाण केल्याने त्यांच्या दहशतीमुळे चालकांनी या भागातील बससेवा बंद केली आहे. त्याचा फटका तेथील सामान्य नागरिकांना बसला आहे.

रमना मारोती परिसरातून शहर बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता त्या भागातून जादा बस सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवडय़ात या भागातून चालक करंदास किरपान बस नेत असताना नगरसेविका साकुरे यांचा मुलगा कमलेश बसवर धडकला. त्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे चिडलेल्या कमलेशसह नगरसेविकेचे पती राजू साकोरे यांनी चालक करंदासला मारहाण केली आणि बस पेटवण्याचा प्रयत्न केला. चालक आणि वाहकाला पकडून ठेवले. साकोरे कुटुंबीयांनी त्याला आपल्या कार्यालयात नेऊन पुन्हा अमानुष मारहाण केली. यात बसचालकाचा हात फॅक्चर झाला.

दरम्यान, या घटनेत नगरसेविकेच्या मुलाची चूक असल्यामुळे आणि त्यांनी चालकाला अमानुष मारहाण केल्यामुळे जोपर्यंत साकुरे कुटुंबीय माफी मागत नाही तोपर्यंत रमना मारोती परिसरातून बस नेणार नाही, असा इशारा शहर बस कर्मचारी संघटनेने घेतला. त्यामुळे या भागात शहर बसफे ऱ्या बंद झाल्या व त्याचा फटका नागरिकांना बसला. तेथील नागरिकांना जवळपास १ किलो मीटपर्यंत पायदळ यावे लागत आहे.

दरम्यान, गुरुवारी परिवहन सभापती बंटी कुकडे बसमध्ये बसून रमना मारोती परिसरात गेले आणि बससेवा सुरू केली. मात्र, त्यानंतरही साकोरे कुटुंबीयांची बस चालकावर दादागिरी सुरू आहे. त्यामुळे भीतीपोटी त्यांनी त्या भागातून बस न नेण्याचा निर्णय घेतला.

जोपर्यंत सुरक्षेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत चालक त्या भागातून जाण्यास तयार नसल्याचे त्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे. जखमी चालक किरपान हा भीतीने त्याच्या गावी गेला आहे.

नगरसेविकेचे पती राजू साकोरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत कुठलीही दहशत नाही. चालकाला मारहाण केली नाही, अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, असे सांगितले.

बससेवा बंद केली नाही

मुलाच्या दुचाकीला बसने धडक दिल्याने त्याने संतापून चालकाला मारहाण केली. मात्र, रमना मारोती परिसरातून बससेवा बंद केली नाही.

रेखा साकुरे, सभापती. नेहरूनगर झोन सभापती

 

लवकरच तोडगा काढू

बसचालकाला मारहाण केल्यामुळे चालकांनी त्या भागातील बससेवा बंद केली आहे. सोमवारी स्वत: बसमध्ये जाऊन रमना मारोती परिसरातून बससेवा सुरू केली. मात्र, चालकांमध्ये दहशत असल्यामुळे ते त्या भागातून बस घेऊन जायला तयार नाहीत. चालक संघटनेशी चर्चा करून लवकर तोडगा काढण्यात येईल.

बंटी कुकडे, सभापती. परिवहन विभाग, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2017 1:20 am

Web Title: bus driver beaten in nagpur
Next Stories
1 मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार?
2 मानसिक आरोग्य विधेयकाचा उद्देश चांगला, मात्र तरतुदी गोंधळ निर्माण करणाऱ्या
3 अतिवृष्टीवरील चर्चा नाकारल्याने गोंधळ
Just Now!
X