01 March 2021

News Flash

क्रिकेट सट्टय़ाच्या कर्जामुळे व्यापाऱ्याची आत्महत्या

क्रिकेट सट्टय़ात हरलेले पैसे वसूल करण्यासाठी क्रिकेट बुकी व आरोपी त्यांना धमकावू लागले.

प्रातिनिधीक छायाचित्र

दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा

नागपूर: आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टय़ात चार ते पाच लाख रुपये हरल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी व्यापाऱ्याला क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी प्रोत्साहित करणारे व क्रिकेट बुकींशी संबंध असणाऱ्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताराचंद रामअवतार अग्रवाल (५९) रा. हिवरीनगर, देशपांडे लेआऊट, नवीन नंदनवन असे मृत व्यापाऱ्याचे तर चंदन खत्री ऊर्फ सोनी रा. कपिलनगर, जरीपटका आणि रवि रा. कामठी अशी आरोपींची नावे आहेत. ताराचंद यांचा कॉटन मार्केट परिसरात कुलर व ऊडवूलचा व्यवसाय आहे. त्याच्या दुकानाच्या विरुद्ध दिशेला आरोपी चंदन व रविही व्यवसाय करतात. आयपीएलचे सामने सुरू असताना आरोपींनी ताराचंद यांना क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. ते जवळपास चार ते पाच लाख रुपये त्यात हरले.

क्रिकेट सट्टय़ात हरलेले पैसे वसूल करण्यासाठी क्रिकेट बुकी व आरोपी त्यांना धमकावू लागले. त्यामुळे २७ मे त्यांचे कुटुंब लग्न समारंभाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी त्यांचा जावई त्यांच्याकडे गेला असता घराचा दरवाजा बंद होता. डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब त्यांचा मुलगा दीपक (३०) याला माहिती दिली. नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक गाडगे यांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत चंदन व रवि यांच्यावर आरोप केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नलावडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 4:17 am

Web Title: businessman suicide cricket betting suicide in nagpur
Next Stories
1 भंडारा-गोंदियातील विजय माझ्यामुळेच – नाना पटोले
2 आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच बांबूंची झाडे लावणार
3 टक्केवारी बघून नव्हे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने करिअर निवडा!
Just Now!
X