News Flash

सिमेंट रस्त्यांचे त्रयस्थांकडून ‘ऑडिट’

‘वेस्ट हायकोर्ट’ मार्गावर दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाले.

महापालिकेच्या आयुक्तांना रस्त्यांच्या बांधकामाबाबत निर्देश देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

पालकमंत्र्यांची घोषणा; जनमंचच्या पाहणीत निकृष्ट बांधकाम उघड

शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून ‘ऑडिट’ केले जाईल व गैरप्रकार झाला असेल तर कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारीवरून ‘जनमंच’ या स्वयंसेवी संघटनेने सोमवारी काही रस्त्यांना भेटी देऊन पाहणी केली. या दरम्यान त्यांना निकृष्ट बांधकाम झाल्याचे दिसून आले. या पाहणी दौऱ्यादरम्यानच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तेथून जात होते. त्यांनी थांबून यासंदर्भात माहिती घेतली आणि कामाच दर्जा तपासणीसाठी ऑडिट करण्याचे आदेश दिले.

रस्त्याच्या कामांना विलंब आणि लोकांच्या गैरसोयीबद्दल ‘लोकसत्ता’ने विशेष वृत्तमालिका प्रसिद्धी केली होती. त्यानंतर जनमंचने पुढाकार घेऊन ‘पब्लिक ऑडिट’ करण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी काही रस्त्यांच्या पाहणी केली.

‘वेस्ट हायकोर्ट’ मार्गावर दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाले. तेथील रस्ता दुभाजक अतिशय तकलादू आहे. धक्का मारला की पडणार अशी त्याची स्थिती आहे. काही भागात रस्त्यांची गिट्टी वर आलेली आहे. पेव्हर ब्लॉक्सचे कामही तकलादू आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था (ड्रेनेज सिस्टिम) नाही. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे बंगले असलेल्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर इतर रस्त्यांच्या दर्जाची काय? पावसाचे पाणी घरात आल्यास लोकांनी पोलिसात तक्रार करावी. संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करावी, असे आवाहन जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले.

दरम्यान, जनमंचचे पदाधिकारी रस्त्यांची पाहणी करत असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या रस्त्याने जात होते. ते थांबले आणि महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना बोलावून घेतले. त्यांनी  सिमेंटच्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचेही चंद्रशखेर बावनकुळे यांनी मान्य केले.

अधिकारी गैरहजर

जनमंचने सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याआधी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन तांत्रिक बाजू समजावून देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती, परंतु महापालिका अधिकारी हजर नव्हते. जनमंचने बांधकाम साहित्याची चाचणी करण्याचे ठरविले होते. त्याला  महापालिकेने नकार दिला.

‘स्मार्ट सिटी अंर्तगत सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहेत. जनतेच्या पैशातून होत असलेल्या या रस्त्यांची कामे मानकाप्रमाणे होत नाहीत. अशा तक्रारी जनमंचकडे येत होत्या. त्यामुळे त्याचे पब्लिक ऑडिट करण्यात आले आणि खरोखर निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे दिसून आले. या कामात मोठी गडबड आहे.’

अ‍ॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, जनमंच.

‘सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. स्त्याच्या कामाचे त्रयस्थाकडून ऑडिट केले जाईल. रस्ते दर्जेदार झाले पाहिजे. ही सरकारची भूमिका आहे.’

चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री.

‘पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार या सिमेंट रस्त्याची त्रयस्थाकडून ऑडिट केले जाईल आणि त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली जाईल.’

अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:37 am

Web Title: cement concrete road issue chandrashekhar bawankule
Next Stories
1 राज्यकर्त्यांकडून भांडेवाडीवासीयांचा अपेक्षाभंग!
2 रात्री आईसक्रीम, दही खाणार, त्याला दमा होणार!
3 सीबीएसई शाळांकडून पुस्तकांच्या नावाखाली लूट
Just Now!
X