05 July 2020

News Flash

केंद्राने नव्याने अर्थसंकल्प सादर करावा

पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना

संग्रहित छायाचित्र

पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना

नागपूर : करोना साथीच्या काळात देशात वेगळी आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने नव्याने अर्थसंकल्प सादर करून देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली .

चव्हाण यांनी आज नागपूरच्या पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. करोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यावर उपाय म्हणून जवळपास सर्वच देशांनी नागरिकांना रोख रक्कम दिली. आताच्या परिस्थितीत नुसते उत्पादन वाढवून चालणार नाही. लोकांची क्रयशक्तीच नसेल तर त्याचा काहीएक फायदा होणार नाही. याचा सारासार विचार करून अमेरिका, ब्रिटन, जपान सर्वच देशांनी पॅकेज देताना नागरिकांच्या हातात जास्तीत जास्त रक्कम कशी जाईल याची तजवीज केली आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मीही हीच मागणी करीत आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येचा विचार करता आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. अशा नाजूक आर्थिक स्थितीत छोटीशी चूकही आपल्याला महागात पडू शकतो.

करोनापूर्वीच भारताचा विकासदर ३.१ टक्के खालीआला होता. करोनामुळे केंद्राला त्यांच्या अपयशावर पांघरून घालण्याचा बहाणा मिळाला. अशा परिस्थिती आपण आत्मनिर्भर कसे होणार असा सवाल चव्हाण यांनी केला.  मुळात आत्मनिर्भर शब्दच चुकीचा आहे. पेट्रोल आणि डिझेल कुठून आणणार? आपण डब्ल्यूटीओचे सदस्य आहोत. त्यामुळे आयात-निर्यात करावीच लागणार आहे. आपल्याकडे भांडवल उपलब्ध नसेल आणि बाहेरचे लोक गुंतवणूक करण्यास तयार असतील तर त्यात काय वावगे आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:02 am

Web Title: center should present new budget says prithviraj chavan zws 70
Next Stories
1 आर्थिक कोंडीतही रोज हजारो लिटर मद्यविक्री
2 पर्यावरण निकष डावलून प्रकल्पांना मंजुरी
3 Coronavirus : नागपुरात करोनाग्रस्तांची संख्या सहाशेपार!
Just Now!
X