प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची नोटीस

नागपूर : शहराची शान असलेले  महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद होण्याच्या स्थितीत येऊन ठेपले आहे. महाराजबाग केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यावर्षी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला अटी पूर्ण केल्याशिवाय मान्यता न देण्याचा पवित्रा घेतला आहे. महाराजबाग प्रशासनाने अटी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्राधिकरणाने सुचवलेल्या सुधारणा दिलेल्या कालावधीत पूर्ण होणे कठीण आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता ३ नोव्हेंबर २०१७ ला संपुष्टात आली, परंतु प्राधिकरणाने ही मान्यता समोर वाढवली नाही. दरम्यान २५ एप्रिल २०१८ ला प्राधिकरणाने महाराजबाग प्रशासनाला खरमरीत मजकूर असणारा नोटीस दिला. वारंवार सांगूनही प्रशासनाने प्राणिसंग्रहालयात आवश्यक त्या सुधारणा केल्या नसल्याने प्रशासनाची कानउघाडणी केली. या सुधारणांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विकास कार्य योजना, वन्यप्राण्यांच्या अधिवासाची व्यवस्था, आरोग्यासंबंधीच्या सुविधा, ब्रिडिंगसाठी आवश्यक परवानगीसह ४७ मुद्यांचा समावेश होता.  प्राधिकरणाने २९ नोव्हेंबर २०१६ ला महाराजबाग व्यवस्थापनाला त्यांच्या परिसरात सुरू असलेले योग वर्ग, मॉर्निग वॉक, कुत्र्याला फिरायला आणणे आदी प्रकार बंद करण्यास सांगितले होते. तसेच सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यासह सर्व प्रशासकीय अधिकार प्राणिसंग्रहालयाच्या प्रभारीला देण्यात यावे, असेही सुचवले होते. वाघाच्या पिंजऱ्यासमोर असलेला हरीण, अस्वल, बिबट यांचा पिंजरा दूर करण्याची सूचना दिली होती. प्राधिकरणाच्या या सूचनांकडे केलेले दुर्लक्ष महाराजबाग प्रशासनाला महागात पडणार अशी चर्चा आहे. दरवर्षी सूचना देऊन मान्यता देणाऱ्या प्राधिकरणाने यावर्षी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी पाठवलेल्या नोटीसमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली असून या कालावधीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण केल्याशिवाय आता प्राणिसंग्रहालयाचा बृहत आराखडय़ाला मंजुरी मिळणे शक्य नाही.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video
three year old boy dies after balloon gets stuck in throat in Ichhalkaranji
फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

दोन महिन्यात सुधारणा

११ मे रोजी दिल्लीत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांना आम्ही ही कामे पूर्ण करण्यासाठी काही कालावधी मागितला. त्यांनी ही मुदत दिली असून येत्या एक-दोन महिन्यात प्राधिकरणाने सुचवलेल्या सुधारणा पूर्ण करण्यात येतील. तसेच महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या बृहत आराखडय़ाला मंजुरी मिळेल, असा विश्वास प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक डॉ. एन.डी. पार्लावर यांनी व्यक्त केला.