लोकसत्ता वार्ताहर,

चंद्रपूर- पद्माापूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेत कार्यरत असलेले वैभव शेरेकर यांची अडीच वर्षांची कन्या वैदिशा शेरेकर हिला दोनशेहून अधिक देशांच्या राजधान्यांची नावं तोंडपाठ असून ती कोणत्याही राजधानीचं उत्तर अचूक सांगते. तसेच या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वजही ती अचूक ओळखते. त्यामुळे तिच्या या असाधारण बुद्धिमत्तेची दखल घेऊन तिच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. अत्यंत कमी वयात तिचे नाव इंडिया बुकात नोंदविण्यात आले असून ती भारतातील कमी वयातील एकमेव मुलगी ठरली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

“शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना…”

चंद्रपूरलगतच्या पद्माापूर येथे दिपाली आणि वैभव शेरेकर राहतात. त्यांना अडीच वर्षांची वैदिशा नावाची मुलगी आहे. वैदिशाला लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी वैभव शेरेकर हे विविध अभ्यासात्मक पुस्तके व खेळणी तिला आणून द्यायचे. तल्लख बुद्धीच्या जोरावर तिने पालकांनी सांगितलेल्या सर्व देशांची नावं व त्यांच्या राजधानी तोंडपाठ केल्या. तसेच २०० देशांचे राष्ट्रध्वजही ती ओळखू लागली. खेळण्या-बागडण्याच्या वयात वैदिशाला तब्बल २०० देशांची नावं, राजधान्या व राष्ट्रध्वज तोंडपाठ आहेत हे असाधारणच म्हणावं लागेल. तिच्या या बुद्धिमत्तेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेने घेऊन तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आले आहे.

वैदिशाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून लहान वयात २०० देश, राजधानी व राष्ट्रध्वज पाठ असणारी भारतातील ही पहिलीच मुलगी ठरली आहे. तिच्या या असाधारण बुद्धिमत्तेमुळे महाराष्ट्रासह चंद्रपूरचे नावही तिने देशभरात पोहोचवले आहे. दरम्यान, सध्या वैदिशा ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवण्यात यावे, यासाठी सराव करीत आहे.