News Flash

बुलेट ट्रेनला जागा देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध

मोक्याची जागा बहाल करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही

* बीकेसीतील जागेची रेल्वेची मागणी अमान्य
* मोक्याची जागा बहाल करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ला मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जागा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. एमएमआरडीएची जागा देता येणार नसल्याचे पत्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना नुकतेच पाठविले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न असून जपानकडून त्यासाठी आíथक व तांत्रिक सहकार्य केले जाणार आहे. जपान सरकारशी याबाबत नुकताच करार करण्यात आला असून सुमारे ९७ हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेनचा प्रकल्प साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने चाचपणी सुरू केली असून कारशेडसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेची मागणी रेल्वेने राज्य सरकारकडे केली होती. ही जागा एमएमआरडीएची असून तिची मागणी गेल्या वर्षीही करण्यात आली होती. पण एमएमआरडीए व राज्य सरकारची त्यास तयारी नव्हती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा करणार होते.
जपान सरकारशी करार केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता पुन्हा जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेची मागणी पुन्हा केली होती. मात्र एमएमआरडीएकडे आता फारशी मोकळी जागा उपलब्ध नसून या जागेची किंमत अब्जावधी रुपये आहे. ती रेल्वेला देणे एमएमआरडीएला आíथकदृष्टय़ा शक्य नाही. रेल्वेकडे दादर व कुर्ला येथे अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध आहे. त्या जागेचा वापर रेल्वेने करावा. पण वांद्रे-कुर्ला संकुलातील जागा देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू यांना नुकतेच पत्र पाठवून त्यांना जागा देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने रेल्वेला आता पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:24 am

Web Title: chief minister opposition for bullet train place
Next Stories
1 बिहार निवडणुकीनंतर पुरस्कार वापसी बंद!
2 अणेंच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक
3 ‘टोरंट पॉवर कंपनीचा करार रद्द करा’
Just Now!
X