News Flash

नक्षलग्रस्त भागाला मुख्यमंत्र्यांची भेट

गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम नक्षलग्रस्त भागाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम नक्षलग्रस्त भागाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी एटापल्ली तालुक्यातील बुरगी या नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गावाला भेट दिली. त्यांच्या हस्ते पोलीस मदत केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. बुरगी येथील मदत केंद्र उभारणीसाठी पोलीस दलाने बजावलेल्या कामगिरीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख त्यांच्या भाषणात केला. यावेळी त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्यमंत्री राजे अम्बरीशराव आत्राम होते. आतापर्यंत या भागाला एकही आमदार आणि मंत्र्यांनी यापूर्वी भेट दिलेली नव्हती, हे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:13 am

Web Title: chief minister visited naxalite areas
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 सिंचन घोटाळ्यातील भाजपशी संबंधित कंत्राटदार अजून मोकळेच!
2 महापालिका अर्थसंकल्पात ११ कोटींची वाढ
3 वन खात्याच्या ताफ्यात ‘रेस्क्यू बाईक्स’ दाखल
Just Now!
X