राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदक देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते.

पुढे ते म्हणाले की बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येणार असून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील अंतिम लढत झाली. दिल्लीच्या संजनाला पराभूत करून महाराष्ट्राची देविका विजेती ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choose sports as a carrier says cm devendra fadnavis
First published on: 07-09-2018 at 19:40 IST