News Flash

४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण नाही

केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिके ने केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केंद्रांवर लसीकरण

नागपूर :  लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी होणार नाही. तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी मंगळवारी ६ केंद्र सुरू राहतील, अशी माहिती महापालिके चे अतिरिक्त आयुक्त. राम जोशी यांनी दिली. कोव्हॅक्सिन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके  महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सर्वोदय मंडळ हॉल छाप्रूनगर सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू,  राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी,

एनआयटी ग्राऊंडजवळ, मनीषनगर, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य के ंद्र या ठिकाणी करण्यात येईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून देण्यात आलेल्या वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिके ने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:04 am

Web Title: citizens above 45 years of age are still not vaccinated akp 94
Next Stories
1 नियंत्रण कक्षाने पाठवलेल्या रुग्णाला रुग्णालय टाळू शकत नाही
2 ‘विकेल ते पिकेल’मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची!
3 भाजपशासित राज्यात करोना आकड्यांची लपवाछपवी
Just Now!
X