नितीन राऊत यांचा सोनिया गांधी यांच्याकडे आग्रह

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केल्याचे समजते. यातून काँग्रेस नेत्यांमधील सुंदोपसुंदी अजूनही संपली नसल्याचे स्पष्ट होते.

Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
arunachal cm among 10 BJP candidates elected unopposed in assembly election
अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध
Who is Sushil Rinku
केजरीवालांचा लोकसभेतला एकमेव खासदारही भाजपामध्ये; कोण आहेत सुशील रिंकू?

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि चार कार्याध्यक्षांनी गेल्या शनिवारी सोनिया गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सोनिया गांधी यांनी विदर्भातील राजकीय स्थितीबाबत राऊत यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्री उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात विलास मुत्तेमवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली जावी, असा आग्रह धरला. पक्षाला पुढे नेण्यासाठी नवीन नेतृत्वाला वाव देण्यास माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रारंभ केला. काँग्रेसमध्ये युवकांना संधी मिळत नसल्याबद्दल राहुल गांधी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्या होत्या. सोनिया गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष झाल्याबरोबर ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचा आग्रह धरून पक्षांतर्गत विरोधकांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे यातून दिसून येत आहे.

सातवेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांचा नागपूर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली. सध्या ते वयाच्या सत्तरीत आहेत. पक्षातील त्यांचे विरोधक समजले जाणारे राऊत यांनी त्यांच्या नावाचा विधानसभेच्या निवडणुकीसाठी थेट पक्षाध्यक्षांकडे आग्रह धरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या भेटीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांना राज्यातील पूरस्थिती आणि विदर्भ, मराठवाडा येथील दुष्काळाची माहिती देण्यात आली.

तोडीचा उमेदवार द्यावा लागेल

यासंदर्भात डॉ. नितीन राऊत म्हणाले, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मंत्री राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे दक्षिण-पश्चिम नागपूरमधील मतदार आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध त्यांच्या तोडीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. नगरसेवक किंवा नगसेविकेला उमेदवारी देणे म्हणजे त्यांना ‘वॉल्क ओव्हर’ देणे आहे. परंतु हा काही फक्त नागपूरपुरता विषय नाही. राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर ज्येष्ठ नेत्यांना महाराष्ट्रात आवश्यक त्या मतदारसंघात उमेदवारी देण्याचे धोरण आखण्याची विनंती आपण पक्षाध्यक्ष यांच्याकडे केली, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.