02 July 2020

News Flash

नारळ पाण्यात दारू मिसळून रुग्णांना पुरवठा!

काही दिवसांआधी येथील डॉक्टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले.

 

मेडिकलमध्ये खुद्द नातेवाईकांचाच पराक्रम

नागपूर : नारळ पाण्यात दारू मिसळून रुग्णांना पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये समोर आला आहे. खुद्द रुग्णाचे नातेवाईकच असा पराक्रम करीत असल्याने डॉक्टरांचेही डोके चक्रावले आहे. त्यामुळे येथील वार्डात नारळ नेण्यावर प्रतिबंध घालावे, अशी मागणीच वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

मेडिकलमधील औषधशास्त्रसह इतरही वार्डात अतिमद्यप्राशनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने उपचार घेत असतात. यातील काही रुग्णांच्या आग्रहावरून त्यांचे नातेवाईक लपून-छपून त्यांना दारू पोहचवत असतात. दारात सुरक्षा रक्षक तैनात असल्याने ही दारू चक्क नारळाच्या पाण्यात मिसळून रुग्णांपर्यंत पोहोचवली जाते.

काही दिवसांआधी येथील डॉक्टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सूक्ष्म निरीक्षण केले असता रुग्णाचे नातेवाईकच नारळ पाण्यात मिळवून  दारू येथे आणत असल्याचे आढळले. दारू भरलेले नारळ रिकामे झाले की ते थेट वरच्या वार्डातून खाली फेकले जाते. त्यामुळे येथील मल वाहिनी अवरुद्ध होण्यासह ते नारळ इतरांच्या डोक्यावर पडल्यास अपघाताचाही धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णाला नारळ पाणी द्यायचे असेल तर ते ग्लासमध्ये देण्याची मागणी  वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्याबाबत हे कार्यालय काय निर्णय घेते, याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या विषयावर मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 1:09 am

Web Title: coconut water mixing alcohol supply medical relative prowess akp 94
Next Stories
1 विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरू मिळणार
2 मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यात हाणामारी
3 विदर्भवाद्यांचे ‘रेल्वे रोको’ आंदोलन फसले
Just Now!
X