29 September 2020

News Flash

काँग्रेस मंत्र्यांमधील शीतयुद्ध विकोपाला?

परस्परांना शह देण्याचे प्रयत्न

संग्रहित छायाचित्र

परस्परांना शह देण्याचे प्रयत्न

नागपूर : विविध गटातटांमध्ये विभागलेल्या जिल्ह्य़ातील काँग्रेसमध्ये सध्या पालकमंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार या दोन मंत्र्यांमधील शीतयुद्धाची चांगलीच चर्चा आहे. दोन्ही नेत्यांकडून परस्परांना शह देण्याच्या प्रयत्नातून पक्षातील राजकारण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नुकत्याच झालेल्या नागपूर भेटीत दोन नेत्यांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती आहे, मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

नितीन राऊत आणि सुनील केदार हे दोन मंत्री तसे  एकाच गटाचे. मात्र मंत्रीपदानंतर उभयंतात मतभेद झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्य़ातील वाळू घाट, वीज केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया, या मुद्यावर राऊत यांनी कोंडी केल्याने केदार नाराज आहेत तर  जिल्हा परिषदेतील सत्तापदे वाटप करताना विश्वासात न घेतल्याने राऊत हे केदार यांच्यावर नाराज आहेत. राऊत यांनी  गृहमंत्र्यांना सोबत घेऊन केदार यांच्या सावनेर मतदारसंघातील वाळू घाटांची पाहणी केली होती, हे येथे उल्लेखनीय.

दुसरीकडे केदार यांनी राऊत यांना शह देण्यासाठी पक्षातील राऊत विरोधी गटासोबत भेटीगाठी वाढवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केदार यांची वाढलेली जवळीक त्यांच्या विरोधकांना खटकणारी आहे. या शिवाय राऊत -केदार वादाचे मूळ दिल्लीतील काही घडामोंडींमध्ये दडले असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

या वादाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकताच नागपूर दौरा झाला. तो जिल्ह्य़ातील करोना आढवा घेण्यासाठी होता. मात्र थोरात बैठकीच्या पूर्वसंध्येला नागपुरात आले होते व त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशीही विविध मुद्यांवर चर्चा केली.

त्यात मंत्र्यांमधील वादाचा मुद्दाही होता,अशी माहिती आहे. यासंदर्भात थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र पालकमंत्री नितीन राऊत यांनी केदार यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. वादच नसेल तर समेट कसला, असा प्रतिसवाल त्यांनी केला. केदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामात व्यस्त असल्याने फोन घेता येणार नाही, असे लघुसंदेशाद्वारे कळवले.

केदार यांच्याशी कुठलेही मतभेद किंवा वाद नाही. त्यामुळे समेट घडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोरात हे करोनासाथीचा आढावा घेण्यासाठी आले होते.

– नितीन राऊत, पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:06 am

Web Title: cold war between guardian minister nitin raut and minister sunil kedar zws 70
Next Stories
1 नागपूरनगरीत ‘अयोध्येचा आनंद’!
2 Coronavirus : पुन्हा १५ बाधितांचा मृत्यू!
3 मॉल उघडले, व्यावसायिक संकुले बंदच!
Just Now!
X