07 April 2020

News Flash

दिवाळीत गॅसधारकांना कंपनीकडून फटका

सिलिंडरच्या अधिकच्या किंमतीवरून ग्राहक आणि व्हेंडर यांच्यात वाद उद्भवू लागले आहेत.

आधार नोंदणीची पावती दाखवली तरी गॅस कनेक्शन मिळेल.

बुकिंग करताना ५७१ तर घेताना ६११ रुपये दर

दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी करणाऱ्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा फटका दिला आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर सांगण्यात आलेली सिलिंडरची किंमत आणि डिलेव्हरीच्या वेळी घेण्यात येणारा दर याच्यात ४० रुपयांचा फरक आहे. सिलिंडरच्या अधिकच्या किंमतीवरून ग्राहक आणि व्हेंडर यांच्यात वाद उद्भवू लागले आहेत.

शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ज्या ग्राहकांनी २८ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरची बुकिंग केली, त्यांना ३१ ऑक्टोबरला दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास एचपीतर्फे लघुसंदेश पाठवण्यात आला. त्यात सिलिंडरची किंमत ५७१.५० रुपये असल्याचे म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात ग्राहकाला सिलिंडर देत असताना ६११.५० रुपये आकारण्यात येत आहे. कंपनीकडून किंमतीबाबत मिळालेला संदेश आणि आकारण्यात आलेली किंमत यात ४० रुपयांचा फरक असल्याने ग्राहकांनी व्हेंडरकडे त्यासंदर्भात विचारणा केली असता लघुसंदेश सोडा, बिल बघा, सिलिंडरच्या किंमती वाढल्याचे व्हेंडर सांगतो आहे. या प्रकारामुळे वादावादी निर्माण होत असून ऐन दिवाळीत दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांचे जागतिक बाजारपेठेतील पेट्रोलियम पदार्थाच्या किंमतीवर दर ठरवण्याचे धोरण आहे. त्यामुळे सोमवारी झालेल्या दरवाढीचा बोझा ग्राहकांवर पडला आहे. ग्राहकांनी गॅस सिलिंडर बुकिंग करताना असलेला दर आणि प्रत्यक्षात सिलिंडर घेण्याच्यावेळीचा दर वेगवेगळा होत असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. बुकिंग करताना जो दर असेल त्याच दराने सिलिंडर देण्याची मागणी होत आहे. बुकिंग केल्यानंतर कॅश मेमो तयार केला जातो. तसेच ग्राहकांना बुकिंग क्रमांक दिला जातो. कॅश मेमो बदलून सिलिंडरची वाढीव किंमत का घेण्यात येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अशाप्रकारची ग्राहकांची लूट करू नये, अशी मागणी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या बुधवारी बाजारातील गॅस एजन्सीसमोर तक्रार करण्यास आलेले ग्राहक महेश शिरभाते यांनी केली.  पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवले. हे दर सोमवारी रात्री लागू करण्यात आले आहे, परंतु सोमवारी सकाळी बुकिंगसंदर्भातील लघुसंदेशाला मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेली दरवाढ अन्यायकारक असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियमने केलेल्या दरवाढीनंतर १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत नागपुरात ४० रुपयांनी वाढली आहे. सोमवारी सकाळपर्यंत एका सिलिंडरची किंमत ५७१.५० रुपये होती. ती वाढून ६११.५० रुपये एवढी करण्यात आली. यावेळी अनुदानित सिलिंडरवर ९७.८५ रुपये अनुदान बँकेत जमा करण्यात येणार आहे.

सध्या एका कुटुंबाला एका वर्षांसाठी १२ अनुदानित सिलिंडर येत आहेत. त्यापेक्षा जास्त सिलिंडर बाजारभावानुसार खरेदी करावे लागते.

डिलीव्हरीच्या दिवशीचे दर आकारण्याची पद्धत

कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार दर कमी-अधिक करतात. बुकिंग केल्याच्या दिवशीचा जो दर असेल तो दर ग्राह्य़ धरला जात नाही, तर जे सिलिंडर ग्राहकांच्या घरी पोहोचवले जाते, त्या दिवशी जो दर असेल तोच दर आकारण्यात येतो. त्यासाठी कॅश मेमो बदलण्यात येते, असे एचपी गॅस ग्राहक सेलच्या सदर येथील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दिनेश यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2016 12:45 am

Web Title: company hit gas holders in diwali
Next Stories
1 बाहेरच्या उमेदवाराला विरोध
2 स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांचे घुमजाव
3 गांधीसागर चौपाटीवर ‘खाऊ गल्ली’ लवकरच
Just Now!
X