News Flash

शहरात दिलासा; ग्रामीणची चिंता कायम!

विदर्भातही करोनाचा प्रभाव ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यात २४ तासांत ५१ मृत्यू; २,५३० रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ५१ करोना  रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ हजार ५३० नवीन रुग्णांची भर पडली. दरम्यान, शहरात दिलासा मिळत असला तरी ग्रामीणची चिंता कायम आहे. शहरात चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरून १०.७४ टक्यांवर आले आहे. परंतु, ग्रामीणमध्ये केवळ ३ हजार ३११ चाचण्यांमध्येही सकारात्मक अहवालांचे प्रमाण २२.६२ टक्के आहे.

शहरात सोमवारी  ११ हजार ९९९ तर ग्रामीणला ३ हजार ३११  चाचण्या झाल्या. त्यांचा अहवाल मंगळवारी अपेक्षित आहे. परंतु रविवारी तपासलेल्या जिल्ह्यातील १७ हजार ८३५ चाचण्यांत २ हजार ५३० रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक अहवालाचे प्रमाण १४.१८ टक्के नोंदवले गेले. त्यात शहरात रविवारी तपासलेल्या १२ हजार ७५७ नमुन्यांत १०.७४ तर ग्रामीणला तपासलेल्या ५ हजार ७८ नमुन्यांत २२.६२ टक्के अहवाल सकारात्मक आले. याशिवाय शहरात दिवसभरात १ हजार ३७१, ग्रामीणला १ हजार १४९, जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण २ हजार ५३० नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख १९ हजार २८०, ग्रामीण १ लाख ३० हजार ९६८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ३५७ अशी एकूण ४ लाख ५१ हजार ६०५ रुग्णांवर पोहोचली.  शहरात दिवसभऱ्यात ३१, ग्रामीण १० जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ५१ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ९५२, ग्रामीण २ हजार ६६, जिल्ह्याबाहेरील १ हजार १७५ अशी एकूण ८ हजार १९३ रुग्णांवर पोहोचली आहे.

विदर्भातील मृत्यूसंख्या दोनशेखाली

विदर्भातही करोनाचा प्रभाव ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेल्या २४ तासांत  १९२ करोना रुग्णांचा मृत्यू तर केवळ ७ हजार ५३० नवीन रुग्णांची भर पडली. अनेक आठवड्यानंतर  विदर्भातील मृत्यूसंख्या दोनशेखाली आली आहे. विदर्भात २७ एप्रिलला २५३ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर १५ हजार ५२ रुग्ण आढळले होते. २८ एप्रिलला ही संख्या २८५ मृत्यू तर १५ हजार ३८९ रुग्ण, २९ एप्रिलला २८२ मृत्यू तर १५ हजार ९३८ नोंदवली गेली होती. आता रुग्णसंख्या पुन्हा कमी होत आहे. ६ मे रोजी विदर्भात २०६ मृत्यू तर १२ हजार ७५१ रुग्ण, ८ मे रोजी २४१ मृत्यू तर ११ हजार १३६ रुग्ण, ९ मे रोजी २३० मृत्यू तर १० हजार ७२७ रुग्ण आढळले. आज सोमवारी अनेक आठवड्यानंतर मृत्यूसंख्या २०० खाली तर नवीन रुग्णसंख्याही दहा हजारांच्या आत नोंदवली गेली. सोमवारी दिवसभरात नागपूर शहरात ३१, ग्रामीण १०, जिल्ह्याबाहेरील १०, अशा एकूण  ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्यातील २६.५६ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात २४ तासांत २ हजार ५३० नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात ९ रुग्णांचा मृत्यू तर २३९ रुग्ण, अमरावतीत १५ मृत्यू तर १ हजार ५ नवीन रुग्ण, चंद्रपूरला १५ मृत्यू तर ६९१ रुग्ण, गडचिरोलीत १५ मृत्यू तर १६७ रुग्ण, गोंदियात ९ मृत्यू तर ५१० रुग्ण, यवतमाळला २३ मृत्यू तर ८१५ रुग्ण, वाशीमला ६ मृत्यू तर ४७२ रुग्ण, अकोल्यात १८ मृत्यू तर ४७६ रुग्ण, बुलढाण्यात ७ मृत्यू तर ४०४ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २४ मृत्यू तर २२१ नवीन रुग्ण आढळले.

मुखपट्टीशिवाय फिरणाऱ्यांना दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी विनामुखपट्टी फिरणाऱ्या आठ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे चार हजार रुपयांचा दंड वसूल के ला. या सर्व नागरिकांना मुखपट्टी देण्यात आली. मागील काही महिन्यात शोध पथकाने ३७ हजार ९३१ नागरिकांवर कारवाई करून आतापर्यंत एक कोटी ७३ लाख २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ८६.८६ टक्क्यांवर

शहरात दिवसभरात ३ हजार ६०२, ग्रामीणला २ हजार ४६६ असे एकूण जिल्ह्यायात ६ हजार ६८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ८८ लाख ४१४, ग्रामीण १ लाख ३ हजार ८५५ अशी एकूण जिल्ह्यायात ३ लाख ९२ हजार २६९ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या रुग्णांच्या तुलनेत हे करोनामुक्ताचे प्रमाण ८६.८६ टक्के आहे.

२९ प्रतिष्ठानांवर कारवाई 

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी २९ दुकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई के ली. त्यांच्याकडून दोन लाख १५ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात झोन शोध पथकाने ही कारवाई केली.

सक्रिय रुग्ण ५१ हजारांवर

शहरात २६ हजार १७१, ग्रामीण २४ हजार ९७२ असे एकूण जिल्ह्यायात ५१ हजार १४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ७ हजार २५१ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ४३ हजार ८९२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी :

०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२

औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  :

०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:06 am

Web Title: concern of rural villagers remains in the city akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लस पुरवठ्याबाबत राज्य सरकारकडून दुजाभाव
2 बनावट सातबारा; तक्रारदाराचे घूमजाव
3 लस खरेदीसाठी निधी गोळा करण्यास विभागीय आयुक्तांचा ‘नकार’
Just Now!
X