News Flash

इच्छुकांच्या गर्दीमुळे काँग्रेसपुढे पेच

दहा वर्षांतील त्यांची आमदार म्हणून कामगिरी समाधानकारक नाही.

संग्रहीत छायाचित्र

उमरेड विधानसभा मतदारसंघ

उमरेड राखीव मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या (१३) लक्षात घेता पक्षाला उमेदवार निश्चित करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते दोन वेळा (२००९ व २०१४) आमदार असा राजकीय प्रवास करणारे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांना पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन आणि मोदी लाटेने तारले होते. यावेळी काँग्रेसने सक्षम उमेदवार दिल्यास राजकीय चित्र पालटू शकते.

ही बाब विचारात घेऊनच काँग्रेसमध्ये अनेकजणांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तब्बल १३ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले. यात प्रामुख्याने संजय मेश्राम, शशिकांत मेश्राम, तक्षशिला वागधरे, अमरजित तिरपुडे, गजानन जांभुळकर, राजू पारवे, प्रशांत बकाने, वासुदेव ढोके यांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते व जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक येथून २००४ मध्ये विजयी झाले होते. पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघाची बांधणी केली. मात्र, मतदारसंघ राखीव झाल्याने २००९ मध्ये मुळक कामठीतून लढले व येथून पक्षाने शिरीष मेश्राम यांना संधी दिली. त्यांचा भाजपकडून प्रथमच लढताना सुधीर पारवे यांनी पराभव केला. या पराभवामुळे काँग्रेसची मतदारसंघावरील पकड कमी झाली. दुसरीकडे बसपानेही या भागात चांगली मुसंडी मारली. २०१४ च्या निवडणुकीत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. पारवे दुसऱ्यांदाही विजयी झाले होते.

दहा वर्षांतील त्यांची आमदार म्हणून कामगिरी समाधानकारक नाही. मात्र  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना आघाडी मिळाल्याने पारवेंचा उत्साह वाढला आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडीची भूमिका याही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

बसपाकडून वृक्षदास बन्सोड  हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी २०१४ मध्ये लक्षणीय मते घेतली होती. याच निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना राजू पारवे यांनी २० हजारावर मते घेतली होती. ते यावेळी काँग्रेसमध्ये आहेत.

२००९

सुधीर पारवे (भाजप) – ८५४१६

संजय मेश्राम (काँग्रेस) – ४०७२०

संदीप गवई (अपक्ष) – १५९४९

विनोद पाटील (बसपा) – १२२४६

२०१४

सुधीर पारवे (भाजप) – ९२३९९

रूक्षदास बनसोड (बसपा) – ५८३२२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 12:41 am

Web Title: congress bjp bsp independent candidate umred assembly ward
Next Stories
1 १३.६७ कोटींचे मुद्रांक शुल्क भरा!
2 ‘फ्रेन्ड्स’च्या घटनेनंतर उपराजधानीतील महिलांमध्ये भीतीचे वातावरण
3 १५ वर्षांपासून पगार न मिळाल्याने शिक्षकाची आत्महत्या
Just Now!
X