News Flash

निसटता पराभव झालेल्या प्रभागांवर काँग्रेसचे लक्ष

सलग दोनवेळा महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या भाजपला मात देण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असून यातून मार्ग काढण्यासाठी शहर काँग्रेसने प्रथम

सलग दोनवेळा महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या भाजपला मात देण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असून यातून मार्ग काढण्यासाठी शहर काँग्रेसने प्रथम निसटता पराभव झालेल्या वॉर्डावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखली आहे.
विविध समित्यांच्या फेरबदलास अद्याप प्रदेश काँग्रेसकडून हिरवा कंदील मिळाला नसला तरी स्थानिक पातळीवर नेत्यांनी आपल्या सक्रिय कार्यकर्त्यांना हाताशी धरून काही निवडक वॉर्डांवर भर देण्यास प्रारंभ केला आहे. त्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना उमेदवारी आणि शहर काँग्रेस कार्यकारिणीत संधी देण्याचा अपेक्षा उंचावण्यात येत आहे. यामुळे त्या कार्यकर्त्यांनी भाजप नगरसेवक न करू शकलेल्या कामांची यादी तयार करण्यास सुरुवात केली. सोबतच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी पाण्याची दरवाढ, ओसीडब्ल्यूचा कारभार आणि मालमत्ता करात झालेली वाढ आदी मुद्दे हाती घेतले आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या १७ उमेदवारांचा २०० पेक्षा कमी तर २० उमेदवारांचा ४०० पेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी याच ठिकाणी कार्यकर्त्यांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी खासदार विलास मुत्तेमवार आहेत. यामुळे उमेदवारी वाटप करताना फार गटबाजी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, शहरातील माजी केंद्रीय मंत्र्याच्याही गटात नगरसेवक आहे. त्यांना सोबत घेण्याचे दुसरे आव्हान आहे. सध्या कुठेही सत्तेत नसल्याने गटबाजी संपुष्टात आली, असे भासवण्यात येत आहे.

शहर काँग्रेसने अल्पमताने हातातून गेलेल्या वॉर्डात कामे सुरू केली असून कार्यकर्ते जोडण्यास प्रारंभ केला आहे. ब्लॉक अध्यक्षांना वॉर्ड आणि प्रभागातील संघटन मजबूत करण्यास सांगण्यात आले. असे असले तरी सत्ता नसल्याने अपेक्षापेक्षा प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शहरात सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे किरकोळ अपघात नित्याची बाब आहे. महापालिकेने कर वाढवले, रस्त्यांवरील खड्डे अधिक रुंद होत असल्याबद्दल काँग्रेस नेते ओरडत आहे. मात्र विरोधक म्हणून या बाबीचा फायदा त्यांना घेता आलेला नाही.

महात्मा गांधींना श्रद्धांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी खासदार गेव्ह आव्हारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, आमदार सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी कुलगुरू हरिभाऊ नाईक, विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य मुधकराव किंमतकर, माजी एस. क्यू. जामा, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 6:41 am

Web Title: congress bjp in nagpur
टॅग : Bjp,Congress
Next Stories
1 तोच उत्साह, तीच उत्कंठा! नागपूरमधील प्राथमिक फेरीचा दुसरा दिवसही गाजला
2 राज्यातील शिक्षकांचे वेतन थकविणाऱ्या महापालिकांना शिक्षण खात्याने फटकारले
3 गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बस वाहतूकदारांचा धुमाकूळ
Just Now!
X