11 August 2020

News Flash

ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

काँग्रेसच्या नेत्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एका वसाहतीमध्ये शिरून धुडगूस घातला.

नागपूरमध्ये गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते राष्ट्रगीतादरम्यान बसूनच होते.

डीजेसाठी हटकले म्हणून मारहाण, सहाजणांना अटक
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले डीजे बंद करण्यासंदर्भात हटकल्याने दुखावलेल्या काँग्रेसच्या नेत्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एका वसाहतीमध्ये शिरून धुडगूस घातला. या ठिकाणी त्यांनी विटा आणि दगडांनी लोकांना मारहाण केली. या प्रकरणात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहाजणांना अटक केली.
वाडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील लावा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दादाराव डोईफोडे यांच्या मुलीचा काल शुक्रवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी तिरुपती बालाजी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ग्रामपंचायतीमधील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमावेळी डोईफोडे यांनी नियमांचे उल्लंघन करून मैदानावर डीजे लावला होता. या डीजेचा आवाज मोठा होता. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत होता. परंतु रात्री १० वाजता डीजे आपोआप बंद होईल, अशी परिसरातील लोकांची अपेक्षा होती. परंतु रात्री १०.३० वाजेपर्यंत डीजे मोठय़ाच आवाजात सुरू होता. त्यामुळे सभागृहाच्या अगदी विरुद्ध दिशेला असणाऱ्या ओमसाई सृष्टी अपार्टमेंटमधील दोन युवकांनी सभागृहात जाऊन आयोजकांना रात्र खूप झाली असून डीजेचा आवाज कमी करा किंवा शक्य असेल बंद करण्याची विनंती केली. यावरून कार्यक्रमात सहभागी झालेले स्थानिक काँग्रेस कार्यकत्यांचे मन दुखावले आणि त्यांनी त्या दोन युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते पळून आपल्या घरी आले. शिवाय अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांना दार बंद करण्यास सांगितले. परंतु जवळपास २० ते २५ जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि वसाहतीमध्ये घुसून लोकांना दगड आणि विटांनी मारहाण केली. त्यामुळे वसाहतीमधील रहिवासी ४० कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात १०० क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, जवळपास अर्धा ते पाऊन तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे वसाहतीमधील नागरिकांनी एकजूट होऊन गावगुंडांचा सामना केला. त्यावेळी सर्वजण पळून गेले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात जखमी झालेले पलास सोनी आणि दिलीप शेंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि सहाजणांना अटक केली. दादाराव डोईफोडे, अमोल डोईफोडे (३१), मुन्ना थूल (३२), सचिन नितनवरे (२८), उमेश ठाकरे (३०) आणि युवराज उकरे (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपसरपंच रॉबीन शेलार कार्यकर्ते
ग्रामपंचायत निवडणुकीत रॉबीन शेलार या कॉंग्रेस नेत्याचे पॅनल जिंकले. शेलार हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. लोकांना मारहाण करून दहशत निर्माण करणारे आरोपी हे शेलार यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे. परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन वसाहतीला सुरक्षा पुरविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 2:49 am

Web Title: congress workers mess in rural area
टॅग Congress
Next Stories
1 ‘रिपाइं’ची फूट पक्ष नेतृत्वामुळे टळली!
2 दाऊद पाकिस्तानात नाहीच – बासित
3 कृत्रिम पाऊस प्रयोगावर अनिश्चिततेचे ढग
Just Now!
X