17 January 2021

News Flash

सोन्यापेक्षा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग !

अधिक मासात शंभर किलो चांदीची विक्री

अधिक मासात शंभर किलो चांदीची विक्री

नागपूर : करोनामुळे बाजारपेठात आलेली मरगळ आता दूर होत असून बाजारात पुन्हा चतन्य परतत आहे. सध्या अधिक मास असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून सोन्यापेक्षा चांदीच्या वस्तूंना जास्त मागणी आहे. जवळपास शंभर किलो चांदीच्या खरेदीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सध्या सोन्याचे भाव ५२ हजार प्रति दहा ग्रॅमवर गेले आहे. तर चांदीचा दर ६३ हजार प्रतिकिलो आहे. सध्या सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडत आहे. अधिक मासात जावयांसाठी चांदीचे भांडे, देवपाट आदी वस्तू देण्याची प्रथा असल्याने सराफा बाजारात चांदी खेरदी वाढली आहे. टाळेबंदी काळात प्रतिष्ठाने तीन महिने बंद होती.

त्यानंतर शिथिलता मिळाली असली तरी ग्राहकांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवली होती. मात्र आता शहरात करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागपूरकर घराबाहेर पडू लागले आहेत. परिणामी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.

सोन्याची मागणी ही नवरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे व्यापारी नवरात्रीची वाट बघत आहेत. सध्या ते चांदीच्या विविध वस्तू विक्रीत व्यस्त आहेत. अधिक मासात जवळपास शंभर किलो चांदीची विक्री होत असल्याने उलाढालही वाढत आहे. तर पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असल्याने व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारपेठत सोन्या-चांदीची पूर्व नोंदणी केली आहे. तर कारागीरही विविध दागिने तयार करण्यात व्यस्त झाले आहेत.

यंदा दसरा व दिवाळीची खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:59 am

Web Title: consumers are more likely to buy silver than gold zws 70
Next Stories
1 कोणत्या अधिकाराखाली खासगी रुग्णालयांना कोविडचे उपचार बंधनकारक?
2 सक्रिय बाधितांची संख्या आठ हजाराहून कमी
3 वनमहर्षी चितमपल्ली सोलापूरला परतल्यावर वनखात्याला उपरती!
Just Now!
X