29 September 2020

News Flash

१० वर्षांची हमी घेतली तरच रस्त्याचे काम मिळेल

नितीन गडकरी यांची कंत्राटदारांना सूचना

नितीन गडकरी यांची कंत्राटदारांना सूचना

नागपूर : रस्त्यांचे बांधकाम करताना दर्जा उत्तम ठेवून बांधकामाचा खर्च कमी करा. तसेच डांबरी रस्ते बांधताना १० वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची हमी घेतली तरच कंत्राटदाराला काम मिळेल, अशी  सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फिकीतर्फे बिटूकॉन या कार्यक्रमात विविध कंत्राटदारांशी ते  संवाद साधत होते. यावेळी गडकरी म्हणाले, रस्ते बांधकामाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बऱ्याच अंशी यात यशस्वीही झालो आहोत. पण बांधकामाचा खर्च कमी करताना बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड केलेली नाही.

डांबरी रस्ते तयार  करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनीही बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक वाटल्यास जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करावा पण बांधकामाच्या खर्चात बचत करावी असेही ते म्हणाले. महामार्ग बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आतापर्यंत ८० लाख मेट्रिक टन फ्लाय अ‍ॅशचा वापर केला आहे. सध्या औष्णिक उर्जा केंद्राच्या ५०-६० किमी परिसरात फ्लाय अ‍ॅशचा वापर केला जात आहे.  त्यामुळे आता फ्लाय अ‍ॅश सहज उपलब्ध होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डांबरीकरणाचे रस्ते ५ वर्षांत खराब होतात. पाऊस जास्त असलेल्या भागात डांबरीकरणाचे रस्ते अधिक लवकर खराब होतात. त्यामुळे डांबरीकरणाच्या रस्त्यांची आता देखभाल दुरुस्तीसह १० वर्षांची हमी घेणा?ऱ्या कंपनीला काम मिळेल.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून डांबरीकरणाचे रस्ते १० वर्षे खराब होणार नाहीत, याबद्दल या कंपन्यांनी आता विचार करावा. तसेच रस्ते बांधकाम करताना लागणारी माती आणि मुरुम ही परिसरातील तलाव, तळे, नद्य, नाले यांचे खोलीकरण करून त्यामधून प्राप्त करावा, जेणेकरून रस्ता बांधकामासोबत जलसंधारण देखील होईल. अशा प्रकारचे काम बुलडाणा जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे याला बुलडाणा पॅटर्न असे दिलेले आहे.

पुलांचे बांधकाम करताना स्टील ऐवजी स्टील फायबरचा उपयोग केल्यास खर्चात बचत होते. डांबरीकरणाचे रस्ते बांधताना नवीन संशोधनाचा उपयोग करावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:02 am

Web Title: contractors will get road project work only if 10 years guarantee is given nitin gadkari zws 70
Next Stories
1 पूर्व विदर्भातील रुग्णालयांची प्राणवायूसाठी धडपड
2 १५ लाख हेक्टरवर पीक हानी, पंचनामे होणे बाकी
3 चाचणी केंद्रांवर आता बाह्य़ रुग्ण विभाग
Just Now!
X