राज्यातील विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

नागपूर : ओबीसी मागास वर्गातील (ओबीसी) हजारो विद्यार्थी राज्यातील विविध विद्यापीठात पीएचडी करत असताना के वळ १५० विद्यार्थ्यांना व २०१९ नंतर नोंदणी केलेल्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अन्यायकारक जाहिरात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) प्रसिद्ध के ली आहे. त्यावर संतप्त झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

महाज्योतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आर्थिक तरतूद के ली. त्यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी जाहिरात काढण्यात आली. यात अनेक त्रुटी आहेत.

या जाहिरातीमध्ये म्हटले आहे की २०१९ नंतरच्या विद्यार्थ्यांनांच याचा लाभ मिळेल. पण त्यापूर्वीच्या २०१८ आणि २०१७ च्या शिक्षण चालू असणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? तसेच जाहिरातीत विद्यार्थ्यांना दरमहा २०,००० रुपये आर्थिक सहाय्य मिळेल असे म्हटले आहे. ही रक्कम कशाच्या निकषावर ठरवण्यात आली.

विद्यापीठ अनुदान आगोच्या  नियमांनुसार सर्व देशात अधिछात्रवृत्ती ३१ हजार रुपये दरमहा दिली जात आहे. तसेच ही जाहिरात फक्त १५० विद्यार्थ्यांसाठी काढली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाचा विचार करता या जागा अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी चर्चा करून जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.

मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार समाजातील विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असतील तर त्यांनी महाज्योतीकडून सुधारित जाहिरात काढून बार्टी आणि सारथीप्रमाणे सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी. अन्यथा नागपूर येथील महाज्योती कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थी आंदोलन करतील, असा इशारा महात्मा फु ले कृषी विद्यापीठातील आचार्य पदवी विद्यार्थी किरण वर्णेकर यांनी दिला.