नागपूर : दिव्यांगांमध्ये एक वेगळी शक्ती असते. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी के ले.
ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या नवदृष्टी सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे उपस्थित होते. दिव्यांगांना संबोधन करण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी परिसरात वृक्षारोपण के ले. असोसिएशनचा संपूर्ण परिसर त्यांनी पाहिला. दिव्यांगांच्या उपक्र माची माहिती जाणून घेतली. सुरदासच्या कविता सूर्यासारख्या तेजस्वी आहेत. ते दिव्यांग होते, पण त्यांच्या रचना अद्भूत होत्या, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. ब्लाईंड रिलिफ असोसिएशनचा परिसर अतिशय चांगला आहे.

दिव्यांगांची संस्था कशी असावी, यासाठी हे एक मॉडेल ठरू शकते. या संस्थेचे हे ५२वे वर्ष आहे. ही संस्था जेव्हा शंभर वर्षांची होईल, तेव्हा जगातील सर्वोत्तम संस्था म्हणून तिचे नाव घेतले जाईल. संस्थेसाठी जेव्हाही माझी आवश्यकता असेल, तेव्हा मला नक्की आवाज द्या. मी येईल, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.