हॉटेल्स आणि उच्चभ्रू इमारतींमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापे घालायला सुरुवात केल्याने आता सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. नागपूरमध्ये चक्क एका कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी योगेश शाहू (वय २३) आणि राहुल गवतेल (वय २१) या दोन दलालांना अटक केली असून एका विद्यार्थिनीची सुटका करण्यात आली.

नागपूरमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून जरीपटक्‍यातील दिपक नगर विटाभट्‌टी परिसरात एका कारमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचला. पोलिसांनी एका खबरीलाच ग्राहक म्हणून योगेश आणि राहुलशी संपर्क साधायला सांगितले. त्याने योगेश आणि राहुलकडे मुलीची मागणी केली. या मोबदल्यात त्यांनी ३ हजार रुपयांची मागणी केली. दलालांनी खबरीला विटाभट्टी परिसरात अंधारात पार्क केलेल्या एका कारमध्ये नेले.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

काही वेळाने २० वर्षांची तरुणी तिथे आली. ती कारमध्ये येताच दोघे दलाल बाहेर गेले. कारमध्ये छोटा बेड तयार करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी काही क्षणातच छापा घातला आणि मुलीची सुटका केली. यानंतर पोलिसांनी दलालांना अटक केली आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी देहव्यापाराविरोधात कारवाईचा धडाका लावला असून पोलिसांना चकवा देण्यासाठी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांनी ही नवी शक्कल लढवली आहे. कारच्या काचांना काळी फिल्म लावण्यात आली होती. तसेच मागच्या सीट काढून तिथे एक छोटा बेडच तयार करण्यात आला होता. हा प्रकार पाहुन पोलीस चक्रावून गेले आहेत.