२४ तासांत ५,००७  नवीन रुग्ण

नागपूर :  जिल्ह्य़ात करोना कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या २४ तासांत पुन्हा करोना मृत्यूच्या संख्येने शतक गाठत तब्बल ११२   रुग्णांचा बळी घेतला. याशिवाय ५ हजार ७ नवीन रुग्णांची भर पडली. यातच गेल्या दोन दिवसांत सातत्याने नवीन करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्त अधिक आढळल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे.

नागपूर शहरात १ मे रोजी ४ हजार ८५, ग्रामीण २ हजार २७९, जिल्ह्य़ाबाहेरील १२ असे एकूण ६ हजार ५७६ नवीन करोनाग्रस्त आढळले. तर २ मे रोजी शहरात २ हजार ७२४, ग्रामीण २ हजार २६९, जिल्ह्य़ाबाहेरील १४ असे एकूण ५ हजार ७ नवीन रुग्ण आढळले.  १ मे रोजी शहरात ४ हजार ७७३, ग्रामीण २ हजार ८०२ असे एकूण  ७ हजार ५७५ व्यक्ती करोनामुक्त झाले  तर २ मे रोजी शहरात ४ हजार ५९६, ग्रामीण १ हजार ७८० असे एकूण  ६ हजार ३७६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे दोन्ही दिवशी नवीन करोनाग्रस्तांहून करोनामुक्त अधिक नोंदवले गेले. नवीन रुग्णांमुळे रविवापर्यंतच्या शहरातील करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख १ हजार १११, ग्रामीण १ लाख १६ हजार ९९६, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २६३ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख १९ हजार ३७० रुग्णांवर पोहोचली. नवीन करोनामुक्तांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ५३ हजार ९८७, ग्रामीण ८३ हजार ६५७ अशी एकूण जिल्ह्य़ात ३ लाख ३७ हजार ६४४ व्यक्तींवर पोहोचली आहे.