11 August 2020

News Flash

करोनावर आयुर्वेद उपचारांसाठी मंजुरी नाही

राज्याकडून निर्णय झाल्यास बाधितांना पाच आयुर्वेद महाविद्यालयांचा लाभ

संग्रहित छायाचित्र

महेश बोकडे

केंद्रीय आयुष मंत्रालयाने एकीकडे आयुर्वेद उपचारातून नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवून करोना विषाणूला आळा घालण्याबाबत बऱ्याच सूचना जारी केल्या तर राज्यात अद्याप करोनाबाधितांवर आयुर्वेद पद्धतीने उपचाराला शासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या उपचार पद्धतीवर शासनाचा विश्वास नाही का, असा प्रश्न आयुर्वेद तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

देशात सर्वाधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे शासनाने मुंबईच्या आर.ए. पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात ३८० खाटांची सोय केली आहे. तेथील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांकडून वरळी परिसरात रक्तदाब, मधुमेहसह इतर जोखमींच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे चांगले निकाल असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आयुर्वेद उपचारांनी अनेक असाध्य आजाराचे रुग्ण बरे होत असल्याचे आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे करोनावरही उपचार शक्य असल्याचे त्यांचे मत आहे. या तज्ज्ञांच्या दाव्यावरून आयुष संचालनालयाने शासनाकडे करोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेद पद्धतीने उपचाराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावात राज्यातील पाच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांसह इतर आयुर्वेद तज्ज्ञांचा या रुग्णांना लाभ होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्याला अद्याप शासनाची मंजुरी न मिळाल्याने या क्षेत्रातील जाणकार आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

करोना नवीन आजार

असला तरी त्यावर तज्ज्ञांच्या निरीक्षणात अचूक औषधांची मात्रा दिल्यास हा आजारही बरा होणे शक्य आहे. त्यासाठी शासनाकडे तीन ते चार दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.

– डॉ. कुलदीप राज कोहली, संचालक, आयुष संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:52 am

Web Title: corona is not approved for ayurveda treatment abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्राध्यापकांचा ‘तास’ मद्यालयांजवळ
2 कारखाने पुन्हा सुरूकरण्यासाठी कामगारांपुढे हात जोडण्याची वेळ
3 ‘ईडी’कडून गुन्हे दाखल
Just Now!
X