07 March 2021

News Flash

शासकीय दंत महाविद्यालयातही करोनाचा उद्रेक!

‘दंत’च्या १३ तर मेडिकलच्या १२ जणांना बाधा

(संग्रहित छायाचित्र)

‘दंत’च्या १३ तर मेडिकलच्या १२ जणांना बाधा; जिल्ह्य़ात ६ मृत्यू; ५३५ नवीन रुग्णांची भर

नागपूर :  मेडिकलमधील ‘एमबीबीएस’च्या १० विद्यार्थ्यांना सोमवारी करोनाचे निदान झाले होते. इतक्या मोठय़ा संख्येने डॉक्टरांना करोना झाल्याची चर्चा सुरू असतानाच आज मंगळवारी  शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातही करोनाचे १३ रुग्ण आढळले. याशिवाय मेडिकलमध्येही दुसऱ्या दिवशी आणखी १२ जणांना विषाणूची बाधा असल्याचे पुढे आल्याने दोन्ही महाविद्यालयांतील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. याशिवाय जिल्ह्य़ात २४ तासांत करोनाचे ६ मृत्यू तर ५३५ नवीन रुग्णांची भर पडली.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत नुकतेच बीडीएसचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे येथील वसतिगृहात बहुतांश विद्यार्थी पोहोचले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत  बीडीएस द्वितीय वर्षांचे ६ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २ विद्यार्थी, शल्यक्रिया विभागाचे १ अधिव्याख्याता, आंतरवासिता डॉक्टर असलेले ४ अशा एकूण १३ जणांना करोनाने विळख्यात घेतले.

दरम्यान, मेडिकलमध्येही सोमवारपासून आजपर्यंत नवीन २ एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थिनी, ३ परिचारिका, सात निवासी डॉक्टरांनाही करोना झाल्याचे पुढे आले. निवासी डॉक्टरांमध्ये रेडिओथेरपी विभागातील ३, बधिरीकरण विभागातील २, शल्यक्रिया विभागातील १, नेत्ररोग विभागातील १ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शहरात करोनाचा प्रकोप वाढला

शहरात करोनाचा प्रकोप वाढला असून मंगळवारीही दिवसभरात ४८२, ग्रामीण ५१, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ५३५ नवीन रुग्ण आढळले.  २४ तासांत शहरात २, ग्रामीण २, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ६ मृत्यू झाले.  दिवसभरात शहरातील ३२४, ग्रामीण ५८ असे एकूण ३८२ व्यक्ती करोनामुक्त झाले.

सक्रिय बाधितांची संख्या ४,४०५ 

जिल्ह्य़ात करोनामुक्तांच्या तुलनेत सातत्याने जास्तच रुग्ण आढळत असल्याने मंगळवारी शहरात ३,६५७, ग्रामीणला ७४८ असे एकूण ४,४०५ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:40 am

Web Title: corona outbreak in government dental college zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आठ रुग्णालयांत करोना मृत्यूदर पंधरा टक्के!
2 ‘कोर्टात बघून घेईल’ म्हणणे धमकी नव्हे
3 राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्यात अपुरे मनुष्यबळ
Just Now!
X